गायीचे डोहळे जेवण sakal
मराठवाडा

गायीचे डोहळे जेवण

गेवराई तालुक्यातील तळणेवाडी गावात पार पडला कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

गेवराई : गेवराई तालुक्यातील तळणेवाडी या गावात एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गौराईला निरोप देण्याच्या मुहूर्तावर गायीचा डोहाळे जेवण कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी गायीला साडी घालून तिचे औक्षण करण्यात आले व पाच महिलांची ओटी भरण्यात आली. या अनोख्या उपक्रमामुळे येथील महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

गौराईचे आगमन झाल्यापासून दोन दिवसाचा उपवास ठेवत आपल्या परिवारातील लक्ष्मी नावाच्या गायीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम पार्वती रामप्रसाद खरसाडे (रा.तळणेवाडी, ता.गेवराई) यांनी केला.

यावेळी गायीला साडी नेसवण्यात आली. पाच महिलांच्याहस्ते औक्षण करण्यात आले. याचबरोबर पाच महिलांची ओटी भरण्यात आली. शिलाबाई शेळके, सुजाता धस, अश्विनी धस, रुक्मिण इंगोले, मिराबाई लाड, निता नरवडे, सुशिला नरवडे आदी यावेळी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hafiz Saeed: पाकिस्तानातून मोठी बातमी! 'हमजा'वर बेछूट गोळीबार; हाफिज सईदच्या दहशतवादी टोळीचं कंबरडं मोडलं

मुंबई इंडियन्सकडून पहिली संधी, मग बंदी अन् आता RCB साठी ठरला हिरो, कोण आहे Rasikh Salam Dar?

Latest Marathi News Live Update : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल नऊ लाख पोती हळद विक्री

भाजपनं अर्धी लढाई जिंकली, पण विजय कठीण! १३१ व घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीचं आव्हान, फक्त चर्चाच होण्याची शक्यता

Pune Bangalore Highway Expansion : प्रवाशांना दिलासा! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, जूनपर्यंत मार्ग पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT