संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे अडचणीत, असे आहे प्रकरण...

सकाळ वृत्तसेवा

बीड - माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह पतीवर न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता. केज प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेला आदेश अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे.

 बनावट स्वाक्षऱ्या करून लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदावर आपली नेमणूक केल्याच्या कथित संचालक गणपती कांबळे यांच्या फिर्यादीवरुन माजी आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीसह इतर गुन्हे नोंद करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश केजच्या न्यायालयाने दिले होते.

संगीता ठोंबरे या तालुक्यातील लहुरी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक आहेत. तर, त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे या सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत. कथीत संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याची त्यांची तक्रार आहे. सदर व्यवहारात श्रीमती ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांनी आपल्या खोट्या स्वाक्षऱ्या करून शासनाची व जनतेची फसवणूक करून आपणास नाहक गोवण्याचा प्रयत्न केला.

सदर आर्थिक व्यवहारात आपला काही एक संबंध नसून पुराव्यादाखल त्यांनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा फॉरेन्सिक तज्ज्ञ अश्विनी पवार यांचा अहवाल आणि शपथपत्र जोडून तक्रार दिली होती. यावरून केजच्या प्रथमवर्ग न्यायालयाने संगीता ठोंबरे व विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीसह इतर कलमांन्वये गुन्हा नोंद करुन चौकशी करावी आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, या आदेशाच्या विरोधात ठोंबरे यांनी अंबाजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालयात स्थगिती मागितली होती.या प्रकरणात अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापतनेकर यांनी केज न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. या प्रकरणात गणपती कांबळे यांच्या वतीने अंबाजोगाई न्यायालयात प्रवीण मेटे यांनी काम पाहिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

Numerology for Pets: कुत्रा, मांजर, मासे की पक्षी? अंकशास्त्रानुसार पाहा तुमच्या मूलांकासाठी कोणता प्राणी आहे लकी...

Indian Army: पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या भारताच्या ड्रोनवर अमेरिकेची नजर; युद्ध सरावादरम्यान काय घडलं?

दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचा थेट CM Devendra Fadnavis यांना सवाल

कोल्हापुरात मिरवणुकीत तणाव; दोन गट भिडले, लोकांची धावपळ

SCROLL FOR NEXT