file photo 
मराठवाडा

सरपंच महिलेच्या मुलावर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गाव विकासासाठी आलेल्या निधीचा गैरवापर करून तब्बल चार लाख दोन हजार रुपयाचा अपहार करणाऱ्या सरपंच महिलेच्या पुत्रावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुन्नी (ता. धर्माबाद) येथे उघडकीस आला.

धर्माबाद तालुक्यातील जुन्नी या गाव विकासासाठी शासनाकडून ग्रामपंचायत कार्यालयाला चौदाव्या वित्त आयोगाकडून मोठा निधी प्रात झाला. मात्र या ग्रामपंचायतला महिला सरपंच असल्याने त्यांच्या पदाचा गैरवापर करत त्यांचा मुलगा दत्ताहरी लक्ष्मण पाटील याने ग्रामपंचायतचे धनादेश आपल्याजवळ ठेवून ग्रामसेवकाची बनावट स्वाक्षरी व शिक्का तयार करून धनादेश (क्र.७७९६४२) यावर आईचा बनावट अंगठा लावून येताळा (ता. धर्माबाद) एसबीआय शाखेत टाकला. 

धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा 

या धनादेशाद्वारे त्याने आपल्या वैयक्तीक बँक खात्यात चार लाख दोन हजार ५० रुपये आपल्या फायद्यासाठी काढून घेतले. शासनाची व गावकऱ्यांची फसवणुक करून वरील रक्कमेचा अपहार केला. हा प्रकार ता. एक डिसेंबर २०१८ ते ता. २४ एप्रील २०१९ या काळात घडला. या प्रकरणी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सदाशिव बापूराव पुपूलवाड यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलिस ठाण्यात दत्ताहरी पाटील याच्याविरुद्ध अपहाराचा सोमवारी (ता. तीन) जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. उजगरे करत आहेत. 


अभ्यासाला त्रासुन गेलेली विद्यार्थीनी सापडली

नांदेड : येथील महात्मा गांधी मिशन अभियांत्रीकी महाविद्यालयात शिक्षण घेणारी एक विद्यार्थीनी अभ्यासाला कंटाळून घरातून निघून गेली होती. या प्रकरणाची नोंद विमानतळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. परंतु एका सतर्क महिलेमुळे त्या विद्यार्थीनीला तेलंगनातील अरमोरी (जिल्हा निझामाबाद) येथून विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
शहराच्या शारदानगर भागात राहणारी विद्यार्थीनी ही महात्मा गांधी अभियांत्रीकी महाविद्यालयातील एका शाखेत तृतीय वर्षाचे शिक्षण घेते. तिला अन्य विषयासारखी रुची इंग्लीशमध्ये नसल्याने ती त्रासून गेली होती. उद्या परिक्षेत कमी गुण मिळाले तर आपल्या घरचे व मैत्रीणी आपणास चिडवतील यामुळे तीने ता. ३१ जानेवारी रोजी कुठेतरी निघून जाण्याचा निर्णय घेतला. दुपारी महाविद्यालयातून निघून तिने थेट रेल्वेस्थानक गाठले.
 
विमानतळ पोलिसांची कारवाई

हैद्राबादकडे जाणाऱ्या एका रेल्वेने ती निघाली. निझामाबाद रेल्वेस्थानकावर तिची भेट आरमोरी या गावातील एका महिलेसोबत झाली. एकटी मुलगी दिसत असल्याने तिला त्या महिलेनी आपल्या घरी नेले. तिला विश्‍वासात घेऊन सर्व खरी हकीकत विचारली. अभ्यासात मन लागत नसल्याने मी पळून आल्याची कबुली तीने त्या महिलेला दिली. यानंतर तीने विमानतळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांनी खात्री करून आपले सहकारी फौजदार शेख नजीर यांना एका महिला पोलिस व अन्य कर्मचाऱ्यांना पाठविले. शेख नजरी यांनी आरमोरी येथून पळून गेलेल्या विद्यार्थीनीला ताब्यात घेऊन नांदेड गाठले. त्या मुलीला समज देऊन कायदेशीररित्या तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. तसेच तेलंगनातील त्या महिलेचे पोलिसांनी व पिडीत नातेवाईकांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT