चित्र 
मराठवाडा

खत कंपनीसह मालकावर गुन्हा दाखल

नवनाथ इधाटे

फुलंब्री, ता. 20 (जि.औरंगाबाद) : कृषी सेवा केंद्रचालकांना बनावट रासायनिक खताचा पुरवठा केल्याप्रकरणी जालना येथील रासायनिक खत पुरवठा करणारी कंपनी व मालक यांच्याविरुद्ध फुलंब्री, वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खत निरीक्षक तथा फुलंब्री पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.


जालना येथील राजलक्ष्मी ऍग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खरीप हंगाम 2019 च्या सुरवातीला फुलंब्री, वडोदबाजार येथील दोन कृषी सेवा केंद्रचालकांना सिंगल सुपर फॉस्फेटसह काही सीलबंद रासायनिक खतांचा पुरवठा केला. दरम्यान, राम बेंबरे यांनी 20 मे रोजी या दुकानात जाऊन त्या रासायनिक खताचे 11 नमुने घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. पुणे येथील प्रयोगशाळेने 29 मे रोजी हे 11 पैकी 7 नमुने बनावट असल्याचे घोषित केले. फुलंब्री पंचायत समितीला हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर 12 जून रोजी राजलक्ष्मी ऍग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. कंपनीने या नोटिसच्या 24 जून रोजी दिलेल्या उत्तरात पुणे येथील प्रयोगशाळेला पुन्हा तपासणी करण्यात यावी, अशी विनंती केली.

परंतु, पुण्याच्या प्रयोगशाळेने रासायनिक खत बनावट असल्याचे पुन्हा घोषित केले. कृषी आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन शेतकरी व कृषी विक्रेता यांना निकृष्ट खत पुरवठा करण्याच्या हेतूने या खताचे उत्पादन केल्याने सहा जुलैला जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वितरक, विक्रेता व शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याने जालना येथील राजलक्ष्मी ऍग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश फुलंब्री पंचायत समितीला दिले. त्यावरून फुलंब्री पंचायत समितीचे कृषी अधिकारी शेख रज्जाक यांच्या फिर्यादीवरून राजलक्ष्मी ऍग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी व कंपनीचे गणेश रामराव इंगळे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास फुलंब्री पोलिस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत ४ नवीन पोलीस ठाणी, ३ DCP झोन आणि २ ACP विभाग होणार, १,४४८ नव्या पदांना मंजुरी; गृह विभागाचा मोठा निर्णय!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी राजस्थान रॉयल्सने नव्हे, तर 'या' टीमने लावलेली पहिली बोली... आज त्या संघाचं चित्र वेगळं असतं

MPSC Result Exam : एमपीएससीचा निकाल लागला! सोलापूर जिल्ह्याच्या 'विजय'ची बाजी; पाहा एका क्लिकवर यादी

Vaibhav Suryavanshi: या पोरात काहीतरी खास आहे; फक्त त्याला पाहण्यासाठी मी आणि माझी बायको...' R Ashwin झाला जबरा फॅन

Pune Warje News: पुण्यात भरधाव मद्यधुंद कारचालकाचा कहर; वाहनांना धडक देत पोलिसांना चकवण्याचा व अपहरणाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT