Jalna Crime New sakal
मराठवाडा

Jalna Crime New: दोन धारदार तलवारींसह खंजीर जप्त ; सदर बाजार पोलिसांची कारवाई

Jalna Crime New: पोलिसांनी या प्रकरणी शेख तन्वीर शेख कलीम याला ताब्यात घेतले आहे

सकाळ वृत्तसेवा

Jalna Crime New: शहरातील वलीमामु दर्गा परिसरातून सदर बाजार पोलिसांनी दोन तलवारी आणि एक खंजीर जप्त करत सोमवारी (ता. १७) एकाला ताब्यात घेतले. शेख तन्वीर शेख कलीम असे या संशयिताचे नाव आहे.

सदर बाजार पोलिस ठाणे हद्दीत वरिष्ठांच्या आदेशानुसार सोमवारी (ता. १७) रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या दरम्यान शहरातील वलीमामु दर्गा परिसरातील एका व्यक्तीच्या घरी तलवारी व खंजीर असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार सदर बाजार पोलिसांनी शेख तन्वीर शेख कलीम (वय २१, रा. वलीमामु दर्गा) याच्या घराची झडती घेतली.

यावेळी हा दोन धारदार व एक खंजीर मिळून आले. पोलिसांनी या प्रकरणी शेख तन्वीर शेख कलीम याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर, डी.बी. पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलिस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, महिला पोलिस उपनिरीक्षक मंगल सुडके, पोलिस अंमलदार रामप्रसाद रंगे, धनाजी कावळे, इरशाद पटेल, सोमनाथ उबाळे, मनोहर भुतेकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Thane: भिवंडीच्या विकासाला नवी दिशा! घराणेशाहीला नकार; बदलाच्या राजकारणाला मतदारांची साथ, काँग्रेसचा शिलेदार उपमहापौरपदी विराजमान

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

SCROLL FOR NEXT