crime news dispute over adoption of son Ruthless husband killed his wife jalna sakal
मराठवाडा

Crime News : मूलबाळ होत नव्हतं, मुलगा दत्तक घेण्यावरून वाद; निर्दयी पतीने केला पत्नीचा खून

तपासणी दरम्यान पतीमध्ये दोष असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं

सकाळ वृत्तसेवा

जालना : शहरातील शंकरनगर येथील किरायाच्या खोलीत राहणाऱ्या महिलेचा पतीने खून केल्याची घटना शुक्रवारी (ता.३०) सकाळी उघडकीस आली. दरम्यान, याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी घटनेनंतर फरारी झालेल्या पतीस ताब्यात घेतले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेळगाव आटोळ (ता.चिखली) येथील इंदुबाई किशोर आटोळे (वय ४१) या सहा महिन्यांपूर्वी पती संशयित किशोर हिंमतराव आटोळे याच्यासह शंकरनगर येथे किरायाच्या खोलीत राहात होत्या.

किशोर हा सुरक्षारक्षकाचे काम करते. मूलबाळ नसल्याने पती-पत्नीमध्ये सतत भांडण होत होते. त्यातच वैद्यकीय तपासणीदरम्यान पतीमध्ये दोष असल्याने डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. हा प्रकार नातेवाइकांना सांगू नको, शिवाय मुल दत्तक घेण्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते.

अशात शुक्रवारी सकाळी शंकरनगर येथील घरात इंदुबाई आटोळे यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. घटनेनंतर पती किशोर आटोळे हा फरारी झाला होता.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर तपासाला वेग देत कदीम जालना पोलिसांनी फरार किशोर आटोळे याला जुन्या तहसील कार्यालयाच्या परिसरातून रात्री उशिरा पकडले.

या प्रकरणी मयत इंदुबाई आटोळे यांची बहीण प्रतिभा आटोळे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात संशयित किशोर आटोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी निरज राजगुरू, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद मझहर यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य शासकीय रुग्णालयामध्ये हलविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jat Municipality Photo Dispute : जत पालिकेची सभा छायाचित्राच्या वादात; मुख्यमंत्री-आमदारांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी, काँग्रेसचा सभात्याग

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

BABAR AZAM: शतक झालं नाही, तरी बाबर आझमने इतिहास रचला! ७६ धावांच्या खेळीने विराट-पाँटिंगच्या खास क्लबमध्ये एन्ट्री, नेमका कोणता विक्रम?

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

“मी जीवन संपवतोय…” ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट; पोलिसांची धावाधाव

SCROLL FOR NEXT