crime news. sakal
मराठवाडा

Crime News : शंभु सावरगावातील ‘त्या’ मुलीचा खून

नऊ दिवसांपूर्वी विहिरीत आढळला होता मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

जालना : तालुक्यातील शंभू सावरगाव येथील पायल मच्छिंद्र जाधव (वय १३) या मुलीचा खून झाल्याप्रकरणी नऊ दिवसांनंतर सेवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील शंभू सावरगाव येथील पायल जाधव हिच्यासह तिची मैत्रीण रविवारी बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी या मुलींचा शोध घेतला मात्र, त्या मिळून आल्या नव्हत्या. त्यामुळे संपूर्ण गावात या मुली पळून गेल्याची चर्चा सुरू झाली होती.

त्यात रविवारी (ता.१६) रात्री उशिरा बेपत्ता झालेली एक मुलगी घरी परत आली होती. तर सोमवारी (ता.१७) सकाळी पायल हिचा गावातील मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी नऊ दिवसानंतर मयत पायल जाधव हिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून काही संशयितांविरोधात सेवली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपींची नावे सेवली पोलिसांकडून गुलदस्त्यात ठेवली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT