crime sakal
मराठवाडा

Crime : भरदुपारी लाॅजवर नेलं अन्...; अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार

सतरा वर्षीय अल्पवयीन मूलीवर अत्याचार झाल्याची घटना

सकाळ वृत्तसेवा

सेलू : शहरातील रेल्वेस्थानक जवळील गोविंदा लाॅज येथे एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना गुरूवारी (ता.२२) रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली. शहरातील रहदारीच्या रेल्वे स्थानक रस्त्यावरील दुपारी दोन वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीस लाॅजमधील खोलीमध्ये नेऊन तिच्या मनाविरूद्ध अत्याचार केल्याची घटना घडली.

सदरिल घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरीकांनी लाॅजकडे धाव घेतली. या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरीक जमा झाले होते. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मुलीस व तरूणास ताब्यात घेत पोलीस स्टेशन मध्ये नेले. या घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आले होते.

अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी जमीर दादामिया कुरेशी व मोबिन अन्सारी विरोधात बाल लैगींक अत्याचार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सूनिल ओहोळ, पोलीस निरिक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या मार्गदर्शनात सपोनी अंधारे हे करत आहेत.

लाॅज चालकाचा गोरखधंदा

शहरात सात ते आठ लाॅज आहेत. लाॅजवर ज्यावेळेस बुक करायची आहे. त्यावेळी आधार कार्ड किंवा इतर एखादा रहिवाशी पूरावा बंधकारक आहे. मात्र लाॅज चालक पैशाच्या लोभापायी अल्पवयीन मुला - मुलींना, महाविद्यालयीन तरूण -तरूणींना राहण्यासाठी खोली उपलब्ध करून देत आहेत. दोन तासाचे दिड ते दोन हजार भाडे आकारणी केली जाते. दिवसभरात तीन चार ग्राहक आले तर आठ हजाराच्याजवळ भाडे लाॅज मालकाला येते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असून या सर्व लाॅजची दिवसा व रात्री तपासणी करावी अशी नागरिकात चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT