jail sakal
मराठवाडा

Crime News : वडिलांच्या खूनप्रकरणी मुलास कोठडी ; डोक्यात रॉडने मारहाण करून खून; रेणापूर तालुक्यातील घटना

रामराव ग्यानबा बोडके (वय ५२, रा आरजखेड ता रेणापूर) यांना सात एकर शेत जमीन असून त्यांना पत्नी, दोन मुले व मुली असा परिवार आहे.

सकाळ वृत्तसेवा

रेणापूर - पोटच्या पोराने जन्मदात्या बापाचा खून केल्याची खळबळजनक घटना आरजखेडा (ता. रेणापूर) या गावात गुरुवारी (ता. २८) सायंकाळी घडली. रागाच्या भरात मुलाने बापास लोखंडी रॉडने डोक्यावर जबर मारहाण करून गंभीर केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २९) रात्री उशिरा मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी (ता. ३०) आरोपी मुलास न्यायालयासमोर उभे केले असता त्यास ४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

रामराव ग्यानबा बोडके (वय ५२, रा आरजखेड ता रेणापूर) यांना सात एकर शेत जमीन असून त्यांना पत्नी, दोन मुले व मुली असा परिवार आहे. मोठा मुलगा बाळासाहेब रामराव बोडके (वय २६) यांनी काही दिवसांपूर्वी जनावरे खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायात वारंवार अडचणीत आल्याने तो कर्जबाजारी झाला होता.

तसेच त्याने आपल्या घरच्या बैलाची विक्री केली होती. यामुळे काही दिवसांपासून बाप लेकामध्ये वारंवार कुरबुर होत होती. दरम्यान गुरुवारी नेहमीप्रमाणे रामराव बोडके हे आपल्या शेतात गेले. दुपारी ते शेतातील पत्र्यांच्या शेडमध्ये बसले असता त्याचा मुलगा बाळासाहेब बोडके हा तेथे गेला. यावेळी या बाप लेकात किरकोळ कुरबुरी झाली यात मुलाचा राग अनावर झाल्याने त्याने तेथेच असलेल्या लोखंडी रॉडने बापाचा डोक्यात एकामागून एक वार केले.

डोक्याला जब्बर मार लागल्याने रामराव यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेणापूरचे पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे उपनिरीक्षक जिलानी मानुल्ला, पोलिस कर्मचारी अभिजीत थोरात, राजेश यादव, किरण गंभिरे यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची फिर्याद मृताची पत्नी जागृती रामराव बोडके (वय ४७) यांनी रेणापूर पोलिस ठाण्यात दिल्यावरून मुलगा बाळासाहेब बोडके याच्या विरुद्ध शुक्रवारी (ता. २९) खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT