crime News 
मराठवाडा

Chh. Sambhajinagar : नागापूर येथील घरातील स्फोटाचे कारण आले समोर; समीर सलीम शेखविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

कन्नड : कन्नड तालुक्यातील नागापूर येथे (ता.२०) दुपारी एक वाजेच्या सुमारास राहत्या घरात स्फोट झाला. या स्फोटाला कारणीभूत झालेल्या समिर सलीम शेख याच्यावर पिशोर पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायदा २०१३अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पिशोर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे यांनी माहिती दिली.

नागापूर गाव स्फोटाच्या आवाजाने हादरले. समिर शेख याचा घरात हा स्फोट झाला. यात तो स्वतः गंभीर जखमी आहे. औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात तो मृत्युशी झुंज देत आहे.

पिशोर पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक कोमल शिंदे यांनी सांगितले की, समिर याने स्वतंत्र घर केलेले होते. बॉम्ब शोधक व श्वान पथकाने दुर्घटना स्थळावरून संशयास्पद वस्तू व नमुने गोळा केले. पोलिस उपनिरीक्षक महेश भेर्डीकर, सहायक फौजदार उने, डॉग सिंबा यांनी तपासणी केली. यावेळी या ठिकाणी मेनका परिस मिळवण्यासाठी काय मंत्र जपायचे, साधने काय वापरायचे याचा लिखीत तपशील मिळून आला.

स्वत: समिरचे व्हजिंटींग कार्ड आढळून आले. त्यावर उत्साद समिर शेख, बंगाली शक्ती के मालिक असं लिहिलेलं आहे. घटनास्थळी फॉस्फरसची बाटली, गंडे, दोरे, हळद, राख, ताईत अशा अघोरी पुजेसाठी लागणारे साहित्य आढळून आले. तो या घरात एकटाच प्रयोग करायचा. या ठिकाणी अन्य कोणी येत नव्हते. मात्र तो गावोगाव फिरून ग्राहक शोधायचा. याच पत्र्याच्या शेडमध्ये शौच खड्डाही खणण्यात आला आहे.

नागापूर येथे सहायक पोलिस आयुक्त सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय ठाकूरवाड यांनी भेट दिली. समिर शेख याच्या विरोधात जादूटोणा विरोधी कायदा २०१३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बॉम्ब शोधक पथकाने गोळा केलेले नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

समिर शेख (वय -३५) याच्या आईने सांगितले तो एकांतात, घरात एकटाच काय करायचा आम्हाला माहिती नाही. आम्हाला त्याच्या वाड्यात प्रवेश नव्हता. काल स्फोट झाला त्यावेळी आम्ही आमच्या घरातच होतो. आवाजाने आम्ही तेथे धाव घेतली. माझा मुलगा समिर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. डोळे, नाक गायब झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT