aurangabad crime news esakal
मराठवाडा

Crime News : पळून गेलेल्या मुलासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला; आई-वडिलांनी रात्रीतूनच कोयता काढला...

समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने आई-वडिलांनीच पोटच्या मुलीचा विळ्याने वार करून खून केल्याची घटना हिमायतनगर शहरातील नेहरूनगर भागात शुक्रवारी मध्यरात्री घडली. शुक्रवारी सकाळी तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करून मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव केला.

सकाळ वृत्तसेवा

हिमायतनगरः समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने आई-वडिलांनीच पोटच्या मुलीचा विळ्याने वार करून खून केल्याची घटना हिमायतनगर शहरातील नेहरूनगर भागात शुक्रवारी मध्यरात्री घडली. शुक्रवारी सकाळी तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करून मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. डॉक्टरांना संशय आल्याने आई-वडिलांनी मुलीचा खून केल्याचे पुढे आले. दांपत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नेहरूनगर भागात पवार कुटुंब राहते. या कुटुंबातील अंकिता रामराव पवार (वय १७) हिचे परिसरातील एका तरुणाशी प्रेम जुळले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर घरच्यांनी तिला समज दिली होती. दरम्यान महिनाभरापूर्वी ती प्रेम करणाऱ्या मुलासोबत पळून गेली होती. तिच्या घरच्यांनी पळून नेणाऱ्या तरुणाविरुद्ध हिमायतनगर पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोस्को अंतर्गत संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुलीचा शोध घेऊन तिची समजूत काढली व आई- वडिलांच्या स्वाधीन केले. दरम्यान, त्याच मुलासोबत लग्न करण्याबाबत अंकिता ठाम राहिली. समाजात बदनामी होत असल्याच्या भितीने तिची आई पंचफुलाबाई रामराव पवार ( ५५) आणि वडिल रामराव पवार (६०) यांनी शुक्रवारी मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या अंकितावर विळ्याने वार करत तिला ठार केले.

पोलिसांना उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात दाखल केला. अंकिताच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित दांपत्याला पोलिसांनी अटक केली आहे. धर्माबादचे उपविभागीय अधिकारी संपते यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. सहायक पोलिस निरीक्षक नंदलाल चौधरी तपास करीत आहेत.

आत्महत्या केल्याचा केला बनाव

मध्यरात्री अंकिताला ठार केल्यानंतर आई-वडिलांनी घाबरून तिला शुक्रवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अंकिताने स्वतःवर वार करुन घेतल्याचे बनाव त्यांनी उपस्थित डॉक्टरांसोबत बोलताना केला. अंकिताच्या डोक्यावर व कपाळावरील खोलवर जखमांमुळे डॉक्टरांना संशय आला. डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ रुग्णालय गाठून तिच्या आई-वडिलांना पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर या दोघांनी गुन्हा कबूल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठं अपडेट! अहवाल कधी येणार? पगारवाढ कधी? संसदेत सरकारने दिली माहिती

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेनंतर हिंदूत्ववादी संघटनांकडून मंचाचे शुद्धीकरण; काँग्रेसचा भाजपवर निशाणा- हा तर दलितांचा अपमान

Ghatkopar Landslide Case: मुंबईतील मुक्काम ठरला अखेरचा! घाटकोपरमध्ये दरड कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

Ghatkopar Landslide: भाच्यांना वाचवले, पण मुलाला गमावले; घाटकोपर दुर्घटनेत १६ वर्षीय मोहम्मदचा मृत्यू

Child Cancer: मुलांभोवती कर्करोगाचा विळखा घट्ट! चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना मोठा धोका; अन्य ‘सार्क’ देशांतील आजार वाढला

SCROLL FOR NEXT