crime police husband killed wife crime family dispute kej marathwada sakal
मराठवाडा

Crime News : पतीनेच केला पत्नीचा खून; घटनेनंतर स्वतः हून पती पोलीस ठाण्यात दाखल

महिलेचा पती पोलीसात जाऊन स्वतः पोलीसांच्या दाखल

सकाळ वृत्तसेवा

केज : पतीनेच पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीचा वार करून खून केल्याची घटना मंगळवार (ता.०७) रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे ढाकेफळ येथील चौसा वस्तीवर उघडकीस आले.

घटनेनंतर महिलेचा पती पोलीसात जाऊन स्वतः पोलीसांच्या दाखल झाला. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थाळास भेट दिली. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आरती भगवान थोरात (वय-२७) असे आहे.

तालुक्यातील ढाकेफळ येथील चौसा वस्तीवरील भगवान शाहूराव थोरात याने आपली पत्नी आरती थोरात हीच्या गळ्यावर धारदार कुऱ्हाडीने वार करून ठार केल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

घटनेनंतर पती भगवान थोरात याने स्वतः‌ युसुफवडगाव पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळास भेट दिली. मात्र पतीने आपल्या पत्नीचा खून करण्याचे कारण अद्यापही समजू शकले नव्हते. मात्र त्याने पत्नीचा खून करण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? हे पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Latest Maharashtra News Updates : अक्कलकोट तालुक्यात ओला दुष्काळाची स्थिती – जयकुमार गोरे

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

SCROLL FOR NEXT