Jalna  Sakal
मराठवाडा

Jalna Child Marriage : तीन महिन्यांत ४२ बालविवाह रोखले जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; बालविवाह रोखणाऱ्यांचा गौरव करणार

बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाची बैठक शुक्रवारी (ता.सात) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली.

सकाळ डिजिटल टीम

Jalna Child Marriage - बालविवाह रोखणाऱ्यांचा गौरव करणार,ता.७ जिल्हा प्रशासनाची सजगतेमुळे गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातील विविध भागात तब्बल ४२ बालविवाह रोखण्यात आले आहेत. दरम्यान, बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या योद्ध्यांचा गौरव करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिली आहे.

बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाची बैठक शुक्रवारी (ता.सात) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांनी, बालविवाह मुक्त जालना करण्यासाठी बालविवाह निर्मूलन कृती आराखडा प्रभावीपणे राबवावी.

ग्रामस्तरावर बालविवाह थांबविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्रास होत असल्यास गावास प्रत्यक्ष भेट देऊन संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत. तसेच बालविवाह थांबविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या योद्धांचा गौरव करण्यात यावा, असे निर्देश दिले.

बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, समाज कल्याणचे सहायक आयुक्त दत्तात्रय वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ व मंगला धुपे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.एन.चिमिंद्रे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी जी.पी.इंगळे यांच्यासह बाल कल्याण समितीचे पदाधिकारी, संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ.राठोड म्हणाले, की जिल्ह्यात मागील तीन महिन्यात ४२ बालविवाह थांबविण्यास यश आले आहे. तर एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत एकूण ७१ बाल विवाह थांबविले आहेत. सध्या जानेवारीपासून आत्तापर्यंतच्या कालावधीत बालविवाह विषयक दहा प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील पालकांनी आपल्या मुला-मुलींचा विवाह कायद्यान्वये घालून दिलेल्या वयोमर्यादा ओलांडल्यानंतर करावे. गावात होणारे बालविवाह थांबविण्यासाठी सुजाण व्यक्तींनी बालविवाह होत असल्याची माहिती १०९८ क्रमांकाद्वारे प्रशासनाला देवून सहकार्य करावे. बालविवाह संदर्भात माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा कृती दलाचे कामकाज, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग आणि पंचायत विभागासह बालसंरक्षण विषयक कामकाज, बालगृह, संस्थेचे काम, बालकांसंदर्भात काम करणाऱ्या संस्था, बालकल्याण समिती, बालन्याय मंडळ, सामाजिक तपासणी अहवाल, समुपदेशन, दत्तक विधान, ग्राम, तालुका व प्रभाग, जिल्हा बाल संरक्षण समितीचे कामकाज आदी विषयांवरही विस्तृत आढावा जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी घेतला.

गेल्या आर्थिक वर्षात ७१ बालविवाह थांबविले,

यावर्षी बालविवाहविषयक दहा प्रकरणांत गुन्हे दाखल,

बालविवाह रोखणाऱ्यांचा गौरव करणार,

बालविवाहाची माहिती देण्यासाठी १०९८ क्रमांक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी अमोल खुणेला जामीन; धनंजय मुंडेंसोबत बोलणं झालं होतं का?

Viral Video: जत्रेतल्या पाळण्यावर तरुणाचा जीवघेणा स्टंट पाहून तुम्हीही व्हाल थक्क, पाहा व्हायरल व्हिडिओ

UPI Transaction: अखेर संभ्रम संपला! यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट उत्तर दिलं, महत्त्वाची माहिती समोर

ATM Firing Incident :'एटीएम'बाहेरच तरूण व्यावसायिकावर गोळीबार; सहा लाखांची रोकड अन् दुचाकीही पळवली

Latest Marathi News Live Update: अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची एकनाथ खडसेंची मागणी

SCROLL FOR NEXT