crime update latur Accused arrested for fraud of 2 lakh  sakal
मराठवाडा

ओळखीचा फायदा घेत तिघांची केली फसवणूक, आरोपीस अटक

एका व्यक्तीने ओळखीचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांची फसवणूक केली असून या व्यक्तीस अटक करण्यात आली

रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर : शहरातील एका व्यक्तीने ओळखीचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांची फसवणूक केली असून या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.शहरातील आंबेजोगाई रोडवर राहत असलेल्या गोवर्धन व्यंकट काळे (26 वर्ष) यांनी मागील चार दिवसात तिघांची फसवणूक केली आहे. येथील सराफा व्यापारी गजानन कामठेवाड यांच्या सराफा दुकानातून एक लाख 20 हजार किंमतीची 22 ग्रॅम वजनाची गळ्यातील साखळी दुकानातून घेतली व वडिलांना दाखवून आणतो म्हणून निघून गेला.

दुस-या घटनेत शहरातील शिक्षक राम रावण भगत यांच्या हातातील 52 हजार रूपये किंमतीची दहा ग्रॅम वजनाची अशाच प्रकारची अंगठी मला बणवायची आहे म्हणून घेऊन गेला तर तिस-या घटनेत रवि खोमणे यांच्या दुकानातून विंधन विहिरीच्या दोन मोटारी किंमत 42 हजार 500 लगेच पैसे आणून देतो म्हणून घेऊन गेला. वरील तिन्ही व्यक्तीस गोवर्धन काळे परत भेटलेच नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे वरील तिघांना लक्षात आल्याने त्यांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक चितंबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सुहास बेंबडे करीत आहेत.

असा सापडला आरोपी

शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत आरोपीने गुरुवारी (ता. 21 ) मेन कापडाच्या पिशवीत कागदाचे गट्टे भरून यात नोटा असल्याचे भासवले. मला ही रक्कम बँकेत ठेवायची आहे असे म्हणत आरोपीने बँकेतील कर्मचा-यास पिशवी देण्याचा बहाणा करीत हातातील अंगठी काढून घेतली व पळ काढला, परंतु त्यास इतर कर्मचाऱ्यांनी पकडले. आरोपीने चोरलेल्या सर्व वस्तू गंगाखेड या गावी विकल्या असल्याचे सांगीतले. पोलिसांनी आरोपीस गंगाखेड येथे नेले असता चोरलेल्या वस्तू विक्री केलेले ठिकाण आरोपीने सांगीतले असून पुढील तपास चालू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun : थारची रिक्षाला भीषण धडक, ५ जणांचा मृत्यू; चिमुकल्यासह आई-वडिलांचा मृतांमध्ये समावेश

Suryakumar Yadav Catch: बाऊंड्री लाईन मागे केली होती...! सूर्याच्या 'त्या' अविश्वसनीय कॅचवर भारतीय खेळाडूचा धक्कादायक दावा

Pune Airport : पुण्यात पावसाचा फटका; विमानसेवा विस्कळित, प्रवाशांची गैरसोय

Latest Marathi News Live Updates : उड्डाणपूल तयार पण नेत्यांना उद्घाटनाला वेळ मिळेना, सिंहगड रस्ता 'जॅम'

Mobile Recharge Price Increase : मोबाईल रिचार्ज महागले; 'या' बड्या कंपनीने बंद केला लोकप्रिय प्लॅन, ग्राहकांमध्ये संताप..

SCROLL FOR NEXT