fraud esakal
मराठवाडा

Crime News : बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक ; वकिलाला अटक

नगर पालिका भूखंड विक्री प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

बीड : बनावट प्रॉपर्टी कार्ड तयार करून नगरपालिकेच्या मालकीचे भूखंड विक्री करण्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला. या प्रकरणात शासनाची ६० लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केल्यावरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपी असलेल्या अ‍ॅड.अशोक शेटे याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

बीड नगर पालिकेच्या मालकीच्या प्लॉट क्रमांक ९३ व ९६ या भूखंडाची २० लाख रुपयांमध्ये तसेच नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक एकमधील गट तीन मधील मालमत्ता क्रमांक १ - ३ -२१५० हा १८ लाख ४० हजार रूपयांत आपसात खरेदी-विक्री केला. यासाठी आरोपींनी भूमी अभिलेख कार्यालयाचे बनावट प्रॉपर्टी कार्ड तयार करून शासनाची ६० लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार ता. आहे.

सात एप्रिल २०२२ ते एक एप्रिल २०२३ या कालावधीत घडला. या प्रकरणी राजेंद्र ऊर्फ अंबरिश देविदास काटे यांच्या फिर्यादीवरून अशोक देवराव शेटे, मिनाबाई अशोक शेटे (दोघे रा.नाट्यगृहासमोर, बीड), साधना बाळु शिंदे, बाळु सर्जेराव शिंदे (रा.पालवण, ता.जि.बीड) आणि बाळासाहेब आबासाहेब ढोले (रा.शहेंशाह नगर, बीड) यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. गुरले हे करीत आहेत. श्री. गुरले यांनी आरोपी अ‍ॅड. अशोक शेटे याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT