kanda 
मराठवाडा

पिकांची काढणी केली पण खरेदीदार मिळेनात, कुठे ते वाचा...

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी लागू असल्याने आठवडे बाजारदेखील बंद झाले आहेत. शहरात जाता येईना, यामुळे भाजीपाला उत्‍पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परिणामी, जागेवरच त्या पिकांचे नुकसान होत आहे.

खडकी (ता. सेनगाव) येथील शेतकरी गोपाळ फटागरे यांनी त्‍याच्याकडे असलेल्या जमिनीपैकी सहा एकरात कांदा व चार एकरात भेंडीची लागवड केली आहे. सध्या हे पीक विक्रीसाठी हातात आले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे बाहेर जाणे शक्‍य होईनासे झाले आहे. त्‍यांनी कांदा व भेंडीच्या पिकांसाठी लागवड ते आजपर्यंत पाच ते सहा लाख रुपयांचा खर्च केला आहे. हे पीकदेखील जोमात आले आहे. सध्या कांद्याचे पीक काढले आहे, तर भेंडीदेखील मोठ्या प्रमाणात काढण्यासाठी आली तयार आहे.

विक्री कुठे करायची, असा प्रश्‍न
बाजार बंद असल्याने खरेदीदारदेखील त्‍याची खरेदी करीत नाहीत. सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा बंद असल्याने काढून त्‍याची विक्री कुठे व कशी करायची, असा प्रश्न गोपाळ फटागरे यांना पडला आहे. प्रत्येक शेतकरी स्वतः आपल्या मालाची विक्री करू शकत नाहीत. त्याला बाजारपेठेचा व विक्रीचा अनुभव नसतो आणि आलेले व्यापारी पण माल घेत नाहीत, यामुळे अडचण निर्माण झाली आहे. 

पंचनामे करून आर्थिक मदतीचा हात द्यावा
शेतात काढून ठेवलेल्या कांदा पिकाला ठेवण्यासाठी जागाच नाही. शेतातच तो काढून ठेवला आहे. यासाठी झालेला खर्च तरी निघावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, त्‍याची विक्रीच सुरू झाली नसल्याने खर्च तरी कसा निघणार, लाखो रुपयांचे उत्पन्न तयार असताना नुकसान सहन करावे लागत आहे. या बाबत प्रशासनाने पंचनामे करून आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा श्री. फटागरे यांनी व्यक्‍त केली आहे.


पाच ते सहा लाखांपेक्षा अधिक खर्च
चार एकर भेंडी व सहा एकर कांदा लागवड केला आहे. आतापर्यंत यासाठी दोन्ही पिकांसाठी पाच ते सहा लाखांपेक्षा अधिक खर्च झाला आहे. त्‍यापासून मात्र एक एक रुपयादेखील मिळाला नाही. लॉकडाऊनमुळे माल कोठे व कसा न्यायचा, असा प्रश्न आहे. भेंडी जागेवरच कडक होत आहे. यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. - गोपाळ फटागरे, शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT