आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा  sakal
मराठवाडा

उमरगा शहरात 'आयपीएल' वर करोडोचा खेळला गेला सट्टाबाजार !

नुकत्याच झालेल्या क्रिकेटच्या 'आयपीएल'च्या संपूर्ण वेळापत्रकामध्ये उमरगा शहरात करोडो रुपयांचा सट्टाबाजार खेळला व घेतला गेल्याची माहिती बाहेर येत आहे.

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : नुकत्याच झालेल्या क्रिकेटच्या 'आयपीएल'च्या संपूर्ण वेळापत्रकामध्ये उमरगा शहरात करोडो रुपयांचा सट्टाबाजार  खेळला व घेतला गेल्याची माहिती बाहेर येत आहे. यात  सट्टाबाजार खेळणाऱ्यांचे करोडो रुपये बरबाद झाल्याची, तर सट्टा घेणारे बुक्की चालक मात्र आर्थिक फायद्यात असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. दरम्यान सट्टा व बेटिंग खेळण्यावर कायद्याने बंदी असताना शहर व परिसरात हा सट्टाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू असताना याची पोलीसाना खबर नव्हती हे न उलगडणारे कोडे आहे. या संदर्भात सट्टाबाजार खेळणाऱ्याने नाव न छापण्याच्या (Indian Premier League) अटीवर व नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर ही माहिती दिली. क्रिकेटवरचा सट्टाबाजार हा मोठ्या शहरातच खेळला जातो,  हा समज आता चुकीचा ठरविला जात असून, उमरगासारख्या (Umarga) छोट्या शहरातसुद्धा सुरू आहे. सट्टा खेळणाऱ्यामध्ये उच्चभ्रू , सुशिक्षित व व्यापारी मंडळीसह अनेक जण सामील (Osmanabad) असतात.

क्रिकेटचा सामना सुरू होऊन समाप्त होईपर्यंत, प्रत्येक चेंडू, षटक, धावा, अर्धशतक, विकेट ह्यावर सट्टा लावला जातो. परिस्थितीनुसार सट्टाचा भाव खालीवर होत असतो. सट्टा खेळणारा जर विश्वासू असेल तर बुक्की त्या कडून डिपॉझिट घेत नाही. अन्यथा इतर सट्टा खेळणाऱ्यांकडून बुक्की डिपॉझिट घेते. येथे मोठ्या प्रमाणात कर्नाटक व तेलंगणा येथील मंडळी बुक्कीकडे सट्टा लावतात. कारण तिथे पोलीस मंडळी रेड टाकतात, कायद्याची अंमलबजावणी कडकपणे होते. उमरगा शहरात क्रिकेटवर सट्टा घेणारे सहा ते आठ बुक्की असून, पंधरा लाख रुपयेपर्यंतचा खेळ स्वतःकडे ठेवतात. त्यापुढील खेळ मोठ्या शहरातील मोठ्या बुक्कीकडे देतात. हा व्यवहार करोडो रुपयेत होत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे बुक्कीच्या लॅपटॉपला सट्टा खेळणाऱ्याचे मोबाईल जोडलेले असतात. एका लॅपटॉपला किमान पन्नास ते दीडशे मोबाईल जोडलेले असतात. ज्याच्या माध्यमातून सट्टाबाजारचा गोरख धंदा बिनदिक्कत सुरू होता. आता आयपीएलचा मोसम संपला असला तर २०/२० क्रिकेटचा वर्ल्ड कप सुरू झाला आहे. ह्यावर सुद्धा सट्टाच्या माध्यमातून करोडो रुपयेची उलाढाल होईल अशी माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT