बदनापूर (जि.जालना) - राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत असताना बहुतांशी नागरिकांना मात्र आरोग्याची फारशी काळजी नसल्याचे दुर्दैवी चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे. शुक्रवारी (ता. २०) बदनापूरचा आठवडी बाजार बंद ठेवण्याची घोषणा करून देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही व्यापाऱ्यांनी मिनी बाजार थाटला. त्यामुळे चौकात ग्राहकांची णोठी गर्दी झाली होती. नगरपंचायतीने आवाहन करूनही अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवण्यात धन्यता मानली.
हेही वाचा : नवीन वर्षात तरी बदनापूर बसस्थानक होईल का?
अवघ्या जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा विषाणू संसर्गजन्य असून एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. त्यामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन यंत्रणा करीत आहेत. मात्र एवढी जनजागृती करून देखील नागरिक मात्र गांभीर्य दाखविण्यास तयार नाहीत. तसे प्रकार ठिकठिकाणी घडत आहेत.
हेही वाचा : परदेशातून आलेल्या डॉक्टरला नोटीस
बदनापूर तालुक्यात आठवडी बाजार बंद करण्याच्या आवाहनाला ग्रामिण भागातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर दुसरीकडे बदनापूर येथे मात्र आठवडी बाजार नेहमीच्या ठिकाणी भरला नाही, मात्र काही व्यापाऱ्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुकाने थाटून मिनी बाजार भरवलाच. त्या व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे खरेदीसाठी लोकवस्ती असलेल्या चौकात ग्राहकांची गर्दी जमली. पोलिस व नगरपंचायत प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले खरे मात्र त्यांची नजर चुकवत काही व्यापाऱ्यांनी आपली दुकानदारी सुरूच ठेवली.
हेही वाचा : कोरोनाच्या धास्तीतही लाचखोरांची मस्ती
दुसरीकडे नगरपंचायत प्रशासन रिक्षाद्वारे शहरभर फिरून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत. त्यात रुग्णालय, औषधी व किराणा दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याची सूचनाही केली जात आहे, मात्र अनेक व्यापाऱ्यांनी या सुचनेकडे कानाडोळा केला. काही टपरी चालक लपून - छपून गुटखा, सिगारेटची विक्री करीत आहेत. बदनापूर शहरात रस्त्यावर थुंकल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी रस्त्यावर थुंकण्याचे प्रकारही सर्रास घडत आहेत. त्यामुळे अशा बेजबाबदार वृत्तीतून कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, कोरोनाच्या संदर्भात दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अद्याप कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती ठाणे अंमलदार खरात यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.