accident 
मराठवाडा

चाकूरजवळील अपघातात सीआरपीएफचा जवान ठार

प्रशांत शेटे

चाकूर : लातूर येथील केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) प्रशिक्षण जवान फायरिंगसाठी चाकूरकडे येत असताना जिप्सी जीप व ट्रॅव्हल्स यांच्यात अपघात होऊन एक जवान ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आष्टामोड (ता.चाकूर) येथे बुधवारी (ता.२२) सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली आहे. 

लातूर येथील सीआरपीएफ केंद्रातील जवान चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्रात फायरिंगचा सराव करण्यासाठी येत होते. सीआरपीएफच्या के. एल. २२ बी ८३८७ क्रमांकाच्या जीपमध्ये हे जवान येत असताना आष्टामोड जवळील रेल्वे स्थानकाच्या समोरील वळण रस्त्यावर एम. एच. ३८ एफ ५३३३ क्रमांकाच्या ट्रव्हल्सने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात चालक जितेंद्र चौधरी यांचा मृत्यु झाला तर सहाय्यक कमाडंट गंभीरसिंग यांच्या डोक्यास मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत, दुसरे जवान देशमुख हे ही जखमी आहेत.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाची रुग्णवाहिका व दोन डाॅक्टरांचे पथक घटनास्थळी पोहचून जखमींना लातूर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

यंदा शाळांना ४५ दिवसांची उन्हाळा सुट्टी! जानेवारी ते जूनपर्यंत ७६ दिवस विद्यार्थ्यांना सुट्ट्या; एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा

घरकूल लाभार्थींसाठी मोठी बातमी! घरकुलावर सौर संच बसवायला मिळणार ‘CSR’ फंड; लाभार्थींना बॅंकेतूनही घेता येणार कर्ज; घरकूल लाभार्थींना २.१० लाख अनुदान

Video: काव्या मारनच्या संघाचं नाव बदललं, आता ही नवी ओळख घेऊन उतरणार मैदानात

Satara Soldier Martyr: साताऱ्यातील जवान अभिजित मानेंना मध्‍य प्रदेशात वीरमरण; कुटुंबीयांचा आक्राेश, भोसेमध्ये आज होणार अंत्यसंस्कार !

Bhogi Bhaji Recipe: भोगीची भाजी अन् भाकरी बनवण्याची ही 'खास' पारंपरिक पद्धत जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT