Crude oil tanker overturned sakal
मराठवाडा

Crude Oil Tanker Overturned : देवगांव रंगारीजवळ कच्च्या तेलाचा टँकर पलटी; सुदैवाने जिवीतहानी नाही, टँकर चालक जखमी

छत्रपती संभाजीनगरहुन मालेगावकडे कच्चे तेल घेऊन जाणारा भरधाव टँकर देवगांव रंगारी जवळील वळणावर वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने उलटला.

सकाळ वृत्तसेवा

देवगांव रंगारी - छत्रपती संभाजीनगरहुन मालेगावकडे कच्चे तेल घेऊन जाणारा भरधाव टँकर देवगांव रंगारी जवळील वळणावर वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने उलटून रस्त्याच्या डाव्या बाजुला पडल्याने झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. २१) दुपारी दिड वाजेदरम्यान घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर येथुन बारा हजार लिटर कच्चे सरकी तेल घेऊन टॅंकर क्रमांक जी. जे. ०३ बी. टी. ४३२५ हा मालेगाव (मनमाड) कडे देवगांव रंगारी मार्गे जात असताना वेळगंगा नदी पुलाच्या जवळील वळणावर नियंत्रण सुटल्याने देवळी रस्त्याला वीस ते तीस फूट खाली उतरून पलटी झाला.

या अपघातात चालक निर्भय सिंग पदमसिंग चौधरी (वय-५५ वर्ष) रा. रामबळरामनगर, शिरपूर, इंबोंरे शिरपुर, इंदौर, (मध्य प्रदेश) हा जखमी अवस्थेत टॅंकरमध्ये अडकुन पडला. ही माहिती मिळताच देवगांव रंगारी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप राजपुत यांच्या सह पोलीस कर्मचाऱी मधुकर लहाने, दिनेश कोळी, जगदीश बडेकर, ऋषिकेश पैठणकर, भाऊसिंग जारवाल आदीने घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने जखमी चालकास बाहेर काढुन तात्काळ शासकीय रुग्णालयात हालविण्यात आले.

जिथे टँकर पलटी झाला, त्या देवळी रस्त्यावर वर्दळ असते. तसेच काही अंतरावर टोमॅटोचे खरेदी विक्री केंद्र असल्याने नेहमी मजुरांची व शेतकऱ्यांची मोठी वर्दळ असते. परंतु सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

तेल घेण्यासाठी गर्दी..

या अपघातांमध्ये टॅंकरचे मोठे नुकसान होवुन त्यातील कच्चे सरकी तेल देवळी रस्त्यावर पसरले. हे बघुन आजुबाजुच्या गावकऱ्यांनी मिळेल ते साधन घेऊन तेल भरून नेले.

'महामार्गावर मार्गदर्शक बोर्ड लावण्यास ठेकेदारास विसर! संबंधीत विभागाचे दुर्लक्ष!!

या महामार्गाचे काम अत्यंत संतगतीने सुरू असुन रस्त्यावर मार्गदर्शक फलक नाही, रस्त्याच्या दुतर्फा व्हाईट पट्टे नाही, लासुर टी पॉइंटवर गतीरोधक उभारले, तेथेही पट्टे किंवा स्टिकर नाही, तिथेही अनेकदा गंभीर अपघात होवुन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडलेल्या आहेत.

संबंधीत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडत आहेत. तर कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. याकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अपघात स्थळ, वळणावर मार्गदर्शक फलक लावण्यास ठेकेदारास विसर पडल्याचे दिसून येते आहे. दरम्यान अपघाताची देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT