file photo 
मराठवाडा

चहाच्या युगात ‘कपाला’ अच्छे दिन...

प्रल्हाद कांबळे

नांदेड : चहा आणि भारतीय नागरिक यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीस किंवा पाहूण्याचे स्वागत आपण चहाने करतो. महाराष्ट्राचे चहा हे आवडते पेय आहे. चहा पिण्यासाठी कप-बशी याचा वापर पूर्वी होत होता. दरम्यान काळात कप व बशी अडगळीला पडली होती. मात्र आजही अनेकजण कप-बशीचा वापर करतात. त्यांना कप किंवा बशी नसेल तर चहा पिल्यासारखे वाटत नाही. दरम्यानच्या काळात कपाचे महत्व कमी झाले होते. मात्र पुन्हा चहाच्या स्पर्धेत ‘कपाला ’ अच्छे दिन आल्याचे दिसून येते. 

शहरात सध्या सर्वत्र चहाची स्पर्धा सुरू झाली. ठिक- ठिकाणी विविध कंपनीचे किंवा आपल्या ब्रॅंडचे नावे देऊन चहाचे शोरूने नांदेडात एकटच गर्दी केली आहे. त्यामुळे लुप्त पावत असलेल्या कपाचा वापर वाढल्याने कपाला पुन्हा सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे. सकाळचा चहा म्हटले की कप बशीचे अतूट नाते समोर येत असे. कालांतराने चिनी मातीच्या कप बशीला उतरती कळा येऊन चिनी मातीच्या कपाची जागा स्वस्तात मिळत असलेल्या व फुटण्याची भीती नसलेल्या प्लास्टिक व कागदापासून बनविलेल्या कपाने घेतली. त्यामुळे कप बशीचे अतूट नाते संपुष्टात आले. 

चहाचे नांदेड म्हणून ओळख 

सध्या नांदेड शहरात नंबर वन, येवले, गुळाचा चहा, प्रेमाचा चहा अशा विविध प्रकारचा चहा मिळण्याचे हॉटेल ठिक-ठिकाणी थाटण्यात आले असून चहाची स्पर्धा सुरू झाली आहे. चहा पिणाऱ्यांची संख्या वाढली, त्यामुळे चहा विक्रेत्यांनी स्वतः हॉटेलचे नाव ग्राहकांच्या लक्षात राहावे म्हणून चिनी मातीच्या कपावर स्वतः च्या हॉटेलचे नाव प्रसिध्द केले. या हॉटेलमध्ये चिनी मातीच्या कपाला भाव आल्यामुळे या कपाचा वापर आता हातगाड्यावर विक्री होत असलेल्या चहा विक्रेत्यांनी चिनी मातीच्या कपाचा वापर सुरू केल्याचे दिसून येत आहे. कपाला आता सुगीचे दिवस आले असून सध्या वापरात असलेले प्लास्टिक व कागदी कप इतिहास जमा होण्याची शक्यता आहे.

चीनी मातीच्या कपाचे फायदे
ँ चिनीमातीच्या कपामुळे चहा पिंना तोंड जळत नाही. 
ँ कपाला दांडा असल्याने तो व्यवस्थीत धरता येतो.
ँ कप धरण्यासाठी कोणत्याही हाताचा वापर करता येते.
ँ चिनी मातीचा कप हा तेवढा महागडा नसतो. 
ँ फुटला तरी त्याचे अवशेष मातीत मिसळतात.
ँ चहा पितांना त्यातून कुठलेच रासायनीक द्रव्य शरिरात जात नाहीत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ओबीसी मेळाव्यातून पंकजा मुंडे टार्गेट? गोपीनाथ मुंडेंचा वारसा धनंजय मुंडेंना देण्याची भाषा; भुजबळांच्या डोक्यात काय शिजतंय?

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानच्या भूभागाचा प्रत्येक भाग आता आपल्या ब्रह्मोसच्या टप्प्यात आहे - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

fire in apartment at Parliament area : मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अन् अनेक खासदारांची निवासस्थानं असलेल्या संसदभवन परिसरातील अपार्टमेंटला भीषण आग!

Ranji Trophy: पृथ्वी शॉ महाराष्ट्रासाठी पहिल्याच सामन्यात चमकला, ऋतुराज गायकवाडचंही सलग दुसरं अर्धशतक

PM Kisan 21th Installment : शेतकऱ्यांसाठी आनंदाची दिवाळी! 'या' तारखेला येणार PM किसानचा २१ वा हप्ता, पण ही चूक केल्यास मिळणार नाहीत पैसे

SCROLL FOR NEXT