Manoj Jarange sakal
मराठवाडा

Manoj Jarange : अंबड तालुक्यात संचारबंदी ; जिल्हाधिकारी यांचे आदेश

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी (ता. 25) मध्यरात्रीनंतर एक वाजेपासून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशाने संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

तुकाराम शिंदे/दिलीप पवार - सकाळ वृत्तसेवा

अंकुशनगर : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी (ता. 25) मध्यरात्रीनंतर एक वाजेपासून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशाने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्यासह एकूण पाच जणांना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मराठा आरक्षणाच्या सगेसोयरे मसुद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे हे ता. दहा फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत आहेत.

रविवारी (ता. 25) मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत  अचानक अंतरवाली सराटी येथून मुंबईत येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते अंतरवाली सराटीतून भांबेरीपर्यंत गेले. मनोज जरांगे यांच्या अचानक आंदोलनात झालेल्या बदलामुळे भांबेरी येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवाय जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी रविवारी (ता. 25) मध्यरात्रीनंतर संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी आदेश आल्याने मनोज जरांगे यांचा ताफा परत अंतरवाली सराटी कडे वापस निघाला आहे.सध्या मुंबईला जाणार नसल्याचे जरांगे यांची माहिती दरम्यान रविवारी मध्यरात्री  मनोज जरांगे यांच्या एका सहकाऱ्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT