मराठवाडा

निलंग्यात पुन्हा एकदा जनता संचारबंदीची स्थिती, अत्यावश्यक सुविधांसह कडकडीत बंद

राम काळगे

निलंगा (ता.लातूर) : दोन दिवसांपूर्वी शहरांमध्ये आलेल्या बारा परप्रांतीयांपैकी आठ जणांना कोरोनाबाधित असल्याचे अहवाल आल्यामुळे शहर हादरून गेले आहे. रविवारी (ता.पाच) संपूर्ण शहरांमध्ये 'जनता संचारबंदी'पेक्षा तीव्र स्वरूपात नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. शिवाय शहर सुरक्षितेच्या दृष्टीने शहराबाहेर जाणारी व येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आली आहेत. शिवाय संपूर्ण शहरात अत्यावश्यक सुविधाही बंद होत्या.


निलंगा शहरांमध्ये धार्मिकस्थळात आश्रयास असलेल्या बारा परप्रांतीयांपैकी आठ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून शनिवारी (ता.चार) सायंकाळपासूनच हे वृत्त समजताच नागरिकांनी स्वतःहून टाळेबंदीला प्रतिसाद देत असताना याबाबत परप्रांतीय बाधित असल्याचे जाहीर झाल्यामुळे शहरातील व तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण झाले आहे.


नगरपालिकेच्या वतीने तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी दिवसभर सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील रस्त्यावर व शहराबाहेरची सर्व आत येणारे व बाहेर जाणारे रस्ते बंद केल्यामुळे शहरात जनता संचारबंदीपेक्षाही नागरिकांकडून अधिक प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील धार्मिकस्थळ परिसरात रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. शहरातील पेट्रोलपंप खासगी दवाखाने, औषधी दुकानांसह अत्यावश्यक सुविधा पूर्णतः बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण शहर हे वाहतूक व मनुष्यविरहित दिसत आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी तीन दिवस बंद पाळावा असे आवाहन केल्यामुळे प्रशासनाऐवजी शहराच्या गल्लीबोळातील नागरिकांनीही बाहेर जाणारे व येणारे सर्व रस्ते खोदून दगड टाकून बंद केले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर पुन्हा एकदा जनता संचारबंदीसारख्या अवस्थेत झाले आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT