Custody of two people who spread terror In Latur sakal
मराठवाडा

Latur News: लातूरमध्ये दहशत पसरविणाऱ्या दोघांना कोठडी

दहा गाड्या फोडल्या; तिघांना जखमी केल्याचे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

लातूर - येथील जुन्या औसा रस्त्यावर हातात कत्ती घेऊन दहशत पसरवणे, रस्त्यावरील गाड्या फोडणे, तिघांना जखमी केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. एक जण फरारी आहे. या दोघांना २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने आज दिले आहेत, अशी माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दयानंद पाटील यांनी दिली.

येथील जुना औसा रस्त्यावर लक्ष्मी कॉलनी परिसरात मंगळवारी रात्री काही तरुणांना धिंगाणा घातला. हातात कत्ती घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर असलेल्या आठ-दहा कारच्या काचाही फोडल्या. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप डोलारे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करीत अजिंक्य मुळे (रा. दादोजी कोंडदेवनगर) व संकेत तावरे (रा. लक्ष्मी कॉलनी) या संशयितांना ताब्यात घेतले. यात ओम यादव (रा. वसवाडी) हा फरारी झाला.

या तरुणांनी रस्त्यावरील गाड्या फोडल्याच; पण तिघांना जखमी केले. यात कत्तीचा वार लागल्याने स्वप्नील शिवराज इंडे (रा. सास्तूर) हा वाहनचालक जखमी झाला आहे. त्याच्या फिर्यादीवरूनच शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्वप्नील इंडे हा एका गाडीत बसला होता. तेथे हे तरुण आले. त्यांना पैशांची मागणी केली. कत्तीने त्यांच्या मांडीवर वार करून जखमी केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या गाडीच्या काचाही फोडल्या. तसेच विकास विनायक ऐकुरगे व वीरभद्र उत्तम स्वामी यांच्याकडेही पैशाची मागणी करून व त्यांना कत्तीने मारहाण करून मोबाइल हिसकावून घेतला. या प्रकरणी पोलिसांनी संकेत तावरे व अजिंक्य मुळे यांना अटक करून आज न्यायालयासमोर उभे केले. त्यांना २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती पाटील यांनी दिली.

मुळे सराईत गुन्हेगार

पोलिस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासाच्या संदर्भात सूचना दिल्या. या प्रकरणातील अजिंक्य मुळे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोठी कारवाईचे संकेत जगदाळे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat Video: पैशाने भरलेली बॅग, बनियनवर बेडवर बसले अन् हातात...; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

IND vs ENG 3rd Test: दुखापतग्रस्त रिषभ पंतने माघार घेतल्यास ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकतो का? ICC चा नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन

Stock Market Crash: आज शेअर बाजार का कोसळला? सेन्सेक्स 700 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

नवीन मालिका 'तारिणी'साठी झी मराठीची 'ही' मालिका घेणार निरोप? प्रेक्षकांनीच सांगितलं नाव, म्हणाले-

SCROLL FOR NEXT