विठामाय देवकरीण sakal
मराठवाडा

दैठणाच्या रुकमामाय देवकरीण यांचे निधन

परभणीपासून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या परिसरात त्यांचा शिष्य परिवार होता.

सकाळ वृत्तसेवा

दैठणा : चंद्रपूरच्या धुरपतामाय, महाकाली यांची लोकपरंपरा चालवत मागील शंभर वर्षात वेगळी निर्माण केलेल्या दैठणाच्या विठामाय देवकरीण यांच्या वारसदार रुकमामाय देवकरीण यांची दैठणा,( ता., जि. परभणी) येथे रविवारी, 4 वाजता सायंकाळी प्राणज्योत मावळली. त्या 94 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज 15 ऑगस्ट रोजी दैठणा येथे सकाळी 10 वाजता गोदावरीच्या (गंगेच्या) तीरावर अंत्यविधी करण्यात आला.

भंडार उधळत आणि धुरपतामायच्या नावाने, विठामाय- रुकमामाय यांच्या नावाने हार हार बोलत, त्यांची ही अंत्ययात्रा काढण्यात आली होती. चंद्रपूरच्या महाकाली देवीवरील लोकपरंपरा चालवणाऱ्या त्या महत्त्वाच्या दुवा होत्या. त्यांच्या निधनामुळे या लोकपरंपरेची मोठी हानी झाली असल्याची भावना भक्तांमध्ये व्यक्त केली जात आहे.

धुरपतामायच्या या कालावधीमध्ये लोकपरंपरेतील त्या सर्वात ज्येष्ठ देवकरीण होत्या. आपल्या आई व महायोगिनी म्हणून ओळख निर्माण केलेल्या विठामाय देवकरीण यांच्या त्या मोठ्या मुलगी होत्या. तर देवकर प्रल्हाद माले-पाटील यांच्या मोठ्या बहीण होत्या.आपल्या आईची परंपरा जतन करत असंख्य जणांना देवकरीण, देवकर आदींची दीक्षा दिली होती. परभणीपासून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या परिसरात त्यांचा शिष्य परिवार होता. त्यांच्या निधनामुळे धुरपतामायच्या मातृदेवतेच्या लोकपरंपरेला खूप मोठी हानी झाली आहे. यावेळी पोतराज, देवकरीण आणि भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT