dam  sakal
मराठवाडा

parbhani : लोअर दूधना धरणातून ६०६० क्युसेसने नदी पात्रात विसर्ग सुरू

सहा दरवाजे प्रत्येकी ०.३० मीटरने उचलून दूधना नदि पात्रात ६०६० क्युयेसने विसर्ग करण्यात येत आहे

विलास शिंदे - सकाळ वृत्तसेवा

सेलू : लोअर दूधना प्रकल्प धरणात १८१.७८० दलघमी जिवंत जलसाठा जमा झाला असून जिवंत साठा टक्केवारी ७५. ०५ टक्के इतका उपलब्ध झाल्याने धरणाच्या सहा दरवाजे प्रत्येकी ०.३० मीटरने उचलून दूधना नदि पात्रात ६०६० क्युयेसने विसर्ग करण्यात येत आहे.

लोअर दूधना प्रकल्पात होत असलेली पाण्याची आवक लक्षात घेता जलाशय प्रचलन आराखड्यानुसार रविवारी (ता.११) रोजी सकाळी नऊ वाजता प्रकल्पाचे सहा दरवाजे प्रत्येकी ०.३० मीटरने उचलून दूधना नदीपात्रात ६०६० क्युसेसने विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढून पूरस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्या बाबत तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर तत्सम साहित्य इत्यादी तत्काळ काढून घ्यावेत. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन दुधना प्रकल्प धरण पूर नियंत्रण कक्षाच्या वतिने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

SCROLL FOR NEXT