haribhau bagade
haribhau bagade 
मराठवाडा

धरण भरेल पण शहाराला पाणी खैरेंच्या आशिर्वादानेच : बागडे

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : यंदा पहिल्यांदा असे झाले की बाप्पांचे आगमन झाले आणि पाऊस पडला नाही. प्रार्थना करतो की पाऊस पडेल, जायकवाडी पण भरेल. पण खैरे साहेबांनी आशीर्वाद दिला तर पाईपलाईन होतील आणि शहराला पाणी मिळेल असा चिमटा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काढला.

जिल्हा गणेश महासंघातर्फे संस्थान गणपती येथील मिरवणूक आरंभ प्रसंगी ते बोलत होते. शहराच्या पाणीप्रश्नाला गणेश विसर्जनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वाचा फुटली. मिरवणुकीपूर्वी आयोजित कार्यक्रमात शिवसेना नेते खासदास चंद्रकांत खैरे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार कल्याण काळे, प्रदीप जैस्वाल आदींची उपस्थिती होती. यावेळी भाषणासाठी उभे राहिलेले हरिभाऊ बागडे यांनी शहरातील गणेश मंडळांची परंपरा सांगत गणेशोत्सवात पडणारा पाऊस सांगितला. यंदा पावसाने दडी दिल्याचे सांगत त्यांनी पाऊस पडो, जायकवाडी धरणही भरो अशी प्रार्थना आपण करत असल्याचे सांगितले. हे सांगतानाच त्यांनी आपला मोर्चा शहराच्या पाणीप्रश्नाकडे वळवला. पाऊसाची आशा सांगून त्यांनी जायकवाडी धरण भरण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

खैरे साहेब आपण आशीर्वाद दिला तर पाईपलाईन (समांतर) पण होईल आणीबशहरला पाणीही मिळेल असा चिमटा हरिभाऊ बागडे यांनी यावेळी काढला. त्यांचा या वाक्याला मात्र उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत; CM शिंदेंना विश्वास

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT