crop damage  sakal
मराठवाडा

Ambajogai : जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

पूस शिवारात मुसळधार, धनेगाव धरणात ८४ टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई : पूस (ता.अंबाजोगाई) शिवारात मंगळवारी (ता.११) दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान बुधवारी (ता.१२) दुपारी नेकनूर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकीकडे पिकांचे नुकसान झाले तर दुसरीकडे धनेगाव धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे सायंकाळपर्यंत ८४ टक्के पाणीसाठा या धरणात झाला होता.

तालुक्यात जून, जुलै महिन्यात झालेल्या पावसानेही काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर काही ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात मंगळवारी पूस व घाटनांदूर शिवारात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांचे विशेषत: सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. या पावसाने पूस शिवारातील गट नं. ६३ मधील १० ते १५ शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. येथील शेतकरी अशोक त्रिंबक कचरे यांच्या ०.७५ आर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांनी आपल्या शेतात सोयाबीनसह कोबी, वांगे लावले होते. पावसाळ्यात झालेल्या व बुधवारच्या परतीच्या पावसाने या पिकांचे मोठे नुकसान झाले.

त्यांच्यासह इतर दहा शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करून मदत मिळवून द्यावी अशी मागणी अशोक त्रिंबक कचरे या शेतकऱ्याने तहसीलदारांकडे केली आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर केली, परंतु त्यात अंबाजोगाई तालुका वगळला.

तर विमा कंपनीने अग्रिम रक्कम देण्यास नकार दिला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान लातूर, अंबाजोगाई, केज, कळंब या प्रमुख शहरांसह इतर १५ खेड्यांचा पाणी पुरवठा करणाऱ्या धनेगावच्या (ता.केज) मांजरा प्रकल्पात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८४ टक्के पाणीसाठा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra District Courts Bomb Threat : न्यायव्यवस्था हादरली! पुण्याच्या शिवाजीनगरसह राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; एकाच वेळी मेल आल्याने मोठी खळबळ

Palghar Court: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना धमक्या! पालघर न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; ई-मेलमुळे खळबळ, संपूर्ण परिसर रिकामा

Maharashtra Drought: महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये ९५ टक्के कमी पाऊस; मराठवाडा कोरडा, दुष्काळाचे संकट आणखी गडद

Manoj Jarange Patil: ''माझ्याविरोधात महिलांची एक टोळी मुख्यमंत्र्यांना भेटली'', मनोज जरांगेंचा आणखी एक गौप्यस्फोट

Haribhau Bagde Salary Donation: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा पुढाकार; एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा

SCROLL FOR NEXT