खरीप पिकांचे नुकसान sakal
मराठवाडा

परळी तालुक्यात ४१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पंचनाम्यांची गती धिमी : शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, रस्ते-पुलांना दुरुस्तीची गरज

प्रा. प्रवीण फुटके

परळी वैजनाथ : गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांतील नदी-नाले, ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुराचे पाणी शेतात घुसल्याने पिकांबरोबर शेतांतील मातीही वाहून गेली आहे. तालुक्यात अंदाजे ४१ हजार ६०० हेक्टरवर नुकसान झाले असून सध्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी दै.सकाळशी बोलताना दिली.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र ता.७ रोजी गेल्या २० ते ३० वर्षांतील सर्वातजास्त पाऊस पडला. या पावसाने तालुक्यातील सर्व लहान-मोठे धरणे, लघू तलाव, बंधारे, नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नद्यांना पूर आल्याने नदी काठच्या शेतांत पाणी शिरले व तसेच गोदावरी नदीला पूर आल्याने गोदावरी परिसरातील शेतशिवारातील शेती अक्षरशः खरडून गेली. शेतातील पीके, माती वाहून गेली तर उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. ऊस, कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

पाऊस थांबल्यानंतर प्रशासनाच्या वतीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश आले. प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू झाले मात्र हे पंचनामे कासव गतीने सुरू आहेत. आठ दिवस होऊन गेले तरी तालुक्यातील फक्त ५० ते ५५ टक्केच पंचनामे झाले आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना ऑनलाइन आपली तक्रार नोंदविण्याचे सांगण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांनी ऑनलाइन नुकसानीची तक्रार दिली पण अनेक शेतकऱ्यांना अडचणींमुळे नुकसानीची तक्रार व फोटो अपलोड करता आले नाहीत. यासाठी मुदतवाढ देऊन ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच शेतीचे मोठे नुकसान झाल्याने सरसकट नुकसान भरपाई व पीकविमा द्यावा अशीही मागणी होत आहे.

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फक्त शेतीचेच नुकसान झाले असे नाही तर ग्रामीण भागातील अनेक रस्ते या पावसाच्या पाण्यामुळे उखडले आहेत. तसेच अनेक गावांतील नदीवरील पूल खराब झाले. यासाठी ग्रामीण भागातील रस्ते व नदीवरील पुलांची दुरुस्ती आवश्यक आहे.

"तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः गोदावरी काठावरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून येत्या चार ते पाच दिवसांत पंचनामे पूर्ण करून शासनास नुकसानीचा अहवाल पाठवण्यात येणार आहे. तालुक्यात अंदाजे ४१ हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे."-सुरेश शेजूळ, तहसीलदार

"गेल्या अनेक वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शासनाने पीकविमा मिळवून आम्हाला सरसकट आर्थिक मदत करावी."-शितलदास आरसुळे, शेतकरी, गाढे पिंपळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, ODI: 'रोहित आणि मी अजूनही संघासाठी...', विराट मालिकावीर पुरस्कार जिंकल्यानंतर स्पष्टच बोलला; पाहा Video

Nirav Modi Extradition : नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालींना वेग; CBI अन् EDचे संयुक्त पथक लंडनला जाणार!

Gautam Gambhir: 'लोकांनी आमच्या क्षेत्रात नाक खुपसू नये, आम्ही...', वनडे मालिका जिंकल्यानंतर IPL मालकावर भडकला गंभीर

Baramati Election : बारामतीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात; निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात धाव!

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत पक्षप्रवेशावरून मतभेद होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT