file photo 
मराठवाडा

सेलूत माणुसकीचे दर्शन : कोरोनाने निधन झालेल्या हिंदू महिलेवर मुस्लिमांनी केले विधिवत अंत्यसंस्कार

विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : 'कोरोना' महामारीमुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. एकीकडे लाॅकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची महागाने विक्री करुन तर दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रात काही ठिकाणी लूटमार सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळते. परंतु अशा आणिबाणीच्या काळात देखील माणुसकी धर्म जीवंत असल्याचे उदाहरण सेलू शहरात मंगळवार (ता. १३) रोजी पहावयास मिळाला.

शहरातील पार्वतीबाई जैस्वाल (वय ८५) या आजीबाई दोन दिवसांपुर्वी 'कोरोना' पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे दुर्दैवाने मंगळवारी ( ता. १३ ) रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले. परंतु त्यांच्या कुटुंबात कमी मनुष्यबळ असल्याने अंत्यसंस्कार करण्याची मोठी अडचण निर्माण झाली. 

त्यातच आजीबाईचा नातू अमोल जैस्वाल हा नौकरीच्या निमित्ताने पुण्यात असल्याने अंत्यसंस्कार करायचे कसे ? या यक्षप्रश्न उभा झाला.परंतु शहरातील जमाते इस्लामे हिंदच्या युथ विंग व युथ फोरम या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत विधीवत अंत्यसंस्कार करण्याची तयारी दाखवली यामध्ये मोईनुद्दीन सिद्दीकी, शेख साजिद,शोएब हाश्मी, डॉ. मुत्ताहेर खान आदींनी पुढाकार घेऊन तहसील रोडवरील सार्वजनिक स्मशानभुमी मध्ये मंगळवारी अंत्यसंस्कार केले. मुस्लिम युवकांनी घेतलेल्या केलेले कार्य काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कौतुकाचा व हिंदू मुस्लिम ऐक्याचा विषय झाला.

जातीयवाद्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन.

सेलूत मुस्लिम युवकांनी कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत धैर्य दाखवून कोरोनाने निधन झालेल्या हिंदू महिलेवर अंत्यसंस्कार करणे म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे उत्तम उदाहरण होय. या घटनेमुळे जातीयवादाची व धर्मवाद्यांची बीजे रोवणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. शेवटी एवढेच "तु हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा"
- छगन शेरे, संभाजी ब्रिगेड राज्य उपाध्यक्ष

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT