बीड - श्रीक्षेत्र नारायणगडावरील मेळाव्यात आज फुलांचा वर्षाव केला जाणार आहे. त्यासाठी फुले निवडताना मुली.  sakal
मराठवाडा

Dasara Melava : आज मेळावे : मुंडे, जरांगे काय भूमिका मांडणार? भगवान भक्तिगडावर प्रथमच येणार धनंजय मुंडे

श्रीक्षेत्र नारायणगडावर होत असलेल्या पारंपरिक दसरा मेळाव्याला यंदा शनिवारी (ता. १२) मराठा आरक्षण आंदेालक मनोज जरांगे पाटील येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बीड - श्रीक्षेत्र नारायणगडावर होत असलेल्या पारंपरिक दसरा मेळाव्याला यंदा शनिवारी (ता. १२) मराठा आरक्षण आंदेालक मनोज जरांगे पाटील येणार आहेत. तर, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सुरू केलेल्या भगवान भक्तिगडावरील यंदाच्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे देखील प्रथमच हजेरी लावत आहेत. त्यामुळे मेळाव्यांत मुंडे आणि जरांगे पाटील काय भूमिका मांडतात? याकडे लक्ष लागले आहे.

बीड - भगवान भक्तिगड (सावरगाव घाट, ता. पाटोदा) : दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे.

दोन्ही मेळाव्यांची तयारी पूर्ण झाली असून पोलिस दलही सतर्क झाले आहे. श्रीक्षेत्र नारायणगडावर शुक्रवार (ता. ११) पासूनच भाविक मुक्कामी पोचले असून काही भाविक शहरात व्यवस्था केलेल्या मंगल कार्यालयांत पोचले आहेत. पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्तिगडावरील मेळाव्याचे यंदा १० वे वर्ष आहे. तर, बंधू पालकमंत्री धनंजय मुंडे या मेळाव्याला प्रथमच येत आहेत.

पार्किंग व्यवस्था, मैदानाची स्वच्छता, व्यासपीठ व हेलिपॅडची उभारणी दोन्ही ठिकाणी झाली आहे. भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि सुजय विखे हे तीन वेगवेगळ्या हेलिकॉप्टरने येणार आहेत. तर, श्रीक्षेत्र नारायणगडावर शिवाजी महाराज व मनोज जरांगे पाटील हे देखील हेलिकॉप्टरने येणार आहेत.

भगवान भक्तिगडावर येणाऱ्यांनी काळजी घ्यावी, सोबत दशम्या, धपाटे, चपात्या आणा, गूळ, साखर, मीठही सोबत ठेवावे असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. दरम्यान, दोन्ही मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल सतर्क झाले आहे. दोन हजारांच्या आसपास अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला असून शुक्रवारपासूनच बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले.

आदल्या दिवशीपासूनच नारायणगडावर गर्दी

नारायणगडावर आदल्या दिवशीपासूनच भाविक जमा झाले आहेत. काही भाविक शहरातील मंगल कार्यालयात मुक्कामी पोचले. काही भाविक सजविलेल्या बैलगाड्यांतून आले आहेत. गडावर सर्वत्र भगवे झेंडे लावले आहेत. मागच्या चार दिवसांपासून बुंदी गाळली जात असून गडावर तसेच शिवाजी महाराज व जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टीसाठी शुक्रवारीच फुले गडावर पोचली.

या ठिकाणी तात्पुरता दवाखाना आणि तज्ज्ञ डॉक्टरांचीही नेमणूक आरोग्य विभागाने केली आहे. ३०० माजी सैनिकांसह १० हजारांवर स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रसादाच्या साहित्यासह पाणी बॉक्स वाहनांद्वारे गडावर मदतीच्या स्वरूपात पोचले आहेत. या ठिकाणी शहरातील खासगी डॉक्टरांच्या मदतीने दहा खाटांचे आयसीयू बेड तयार करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT