file photo 
मराठवाडा

डेटा विज्ञान कृषी क्षेत्रात क्रांती घडवू शकतो-  डॉ. पराग चिटणीस

गणेश पांडे

परभणी ः आपल्या देशाला समाज व संस्कृतीशी सुसंगत अन्‍नधान्‍य उत्‍पादन तंत्रज्ञानाची गरज आहे. डेटा विज्ञान व कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता याच्‍या आधारे जागतिक कृषि उद्योगात मोठी क्रांती होणार आहे. शेतीशी संबंधीत आकडेवारीचे विश्‍लेषण करणाऱ्या डेटा विज्ञानाबाबत जनजागृती करण्‍याची गरज आहे. याच आधारे शेतकरी शेतीत जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन व उत्‍पन्‍न काढु शकतील, अशी आशा अमेरीकेच्‍या कृषि विभागाचे संचालक डॉ. पराग चिटणीस यांनी सोमवारी (ता.दहा) व्‍यक्‍त केली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ‘डिजीटल तंत्रज्ञानाव्‍दारे स्‍मार्ट शेती – भविष्‍यात्‍मक योजना’ यावर ऑनलाईन आतंरराष्‍ट्रीय परिषदेचे उदघाटन सोमवारी (ता. दहा) झाले. अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे होते. प्रा. जयशंकर तेलंगाणा राज्‍य कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. प्रविणराव, भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ. प्रभात कुमार, अमेरिकेतील ऑरल रोर्बोट युनिवर्सीटीतील तज्ञ डॉ. पावेल नवीटक्‍सी, अर्जेटीना येथील रोसारीओ राष्‍ट्रीय विद्यापीठाचे प्रा.डॉ. जेसल क्रिस्‍टोफर, अल्‍गेरीया येथील फरहात अब्‍बास विद्यापीठाचे प्रा. डॉ. लाबाड रायमा, मुख्‍य आयोजक शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अमेरिकेतील कृषि शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्‍यांमध्ये डिजिटल साक्षरतेवर भर

डॉ. पराग चिटणीस म्‍हणाले, डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमत्‍ताने बुद्धिमान निर्णय समर्थन प्रणाली कृषि क्षेत्रात विकसित करणे शक्‍य आहे. हे सर्व तंत्रज्ञान शेतकरी बांधवाना समजेल अश्‍या भाषेत उपलब्‍ध करावे लागेल. अमेरिकेतील शेती क्षेत्रात  डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. नागरी भागात शेती व व्‍हर्टिकल शेती पध्‍दती विकसित झाली आहे. अद्यायवत डिजिटल तंत्रज्ञान व रोबोटच्‍या माध्‍यमातुन काटेकोर सिंचन पध्‍दती विकसित केली. अमेरिकेतील शेतीचा अद्यायवत तंत्रज्ञानामुळे कमी निविष्‍ठांमध्‍ये मोठया प्रमाणात उत्‍पादन वाढ झाली. अमेरिकेतील कृषि शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्‍यांमध्ये डिजिटल साक्षरतेवर भर दिला जात आहे असेही ते म्‍हणाले.

कुशल मनुष्‍यबळ निर्मितीसाठी परभणी कृषि विद्यापीठ प्रयत्‍नशील

भारत आज अन्‍नधान्‍याच्‍या बाबतीत स्‍वयंपुर्ण झाला आहे. दुध, फळ, भाजीपाला आदी शेती उत्‍पादनात जगात पहिल्‍या किंवा दुस-या क्रमांकावर आहे. जागतिक स्‍पर्धेत भारतीय शेतकरी टिकला पाहिजे. याकरिता आपणास डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या आधारे स्‍मार्ट शेती व काटेकोर शेती करावी लागणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करण्‍याकरिता लागणारे कुशल मनुष्‍यबळ निर्मितीसाठी परभणी कृषि विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे.

- डॉ. अशोक ढवण, कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Female Doctor : ती बीडची आहे म्हणून जर... धनंजय मुंडे साताऱ्यातील महिला डॉक्टर प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?

Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक; कधी अन् कुठे? जाणून घ्या

PMC Election 2025 : PMC निवडणुकीचा सस्पेन्स कायम! आरक्षणाची सोडत कधी? आयोगाने नियमावली दिली, पण तारीख गुलदस्त्यातच

Dr Ajay Chandanwale : डॉ. अजय चंदनवाले यांची एमयुएचएसच्या कुलगुरूपदी नियुक्ती

Unseasonal Rain : शेतकरी संकटात..! अंबडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा आणि वेचणीसाठी मजूर मिळेना, दुहेरी पेच

SCROLL FOR NEXT