dead body was found in the TMC area on Gevrai-Jategaon road Marathi News  
मराठवाडा

Beed News : गेवराई शहरातील टीएमसी परिसरात आढळला आचाऱ्याचा मृतदेह

गणेश नाथा आबदगिरे (वय ४५) रा.मुंगी ता पैठण असे मृताचे नाव असून, ते मागील काही वर्षांपासून गेवराई शहरातील यशराज नगर येथे राहत आहेत.

भास्कर सोळंके

जातेगाव, ता १३- हॉटेलवर जेवण तयार करत असलेल्या एका आचाराचा मृतदेह गुरुवार (ता १३) शहराच्या काही अंतरावरील गेवराई-जातेगाव रस्त्यावरील टीएमसी परिसरात आढळून आला.

गणेश नाथा आबदगिरे (वय ४५) रा.मुंगी ता पैठण असे मृताचे नाव असून, ते मागील काही वर्षांपासून गेवराई शहरातील यशराज नगर येथे राहत आहेत. शहरातील एका हॉटेलवर (आचारी) जेवण तयार करण्याचे काम करत होते. बुधवारी (ता १२) रात्री हॉटेल काम आटोपून घराकडे गेले मात्र घरी न पोहचलेल्या गणेश आबदगिरे यांचा मृतदेह गुरुवार (ता १३) टीएमसी परिसरात आढळून आला. दरम्यान, सदरील मृताची दुचाकी एका स्मशानभूमी नजीक तर येथून काही अंतरावर गणेश आबदगिरे यांचा मृतदेह आढळून आल्याने सदरील मृत्यू संशयास्पद असल्याचे कुटुंबीयाचे म्हणणे आहे.

याबाबत गेवराई पोलीस ठाण्यात माहीती मिळताच फौजदार शिवाजी भूतेकर हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराई उपजिल्हा रूग्णालयात दाखल केला.घात की अपघात तपास केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस येईल असे फौजदार शिवाजी भूतेकर यांनी सांगीतले असून सहायक फौजदार सुतार हे या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT