Swaraj Suryavanshi and Shivraj Suryavanshi sakal
मराठवाडा

Akhada Balapur : बेपत्ता बालकांचे नदीच्या पाण्यात एकमेकांच्या हातात हात धरलेले मृतदेह सापडले

कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील दोन सख्खे चुलत भाऊ चार ते पाच वयोगटातील शुक्रवार (ता. २०) सकाळपासून खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याने गावात उडाली खळबळ.

सय्यद अतिक

आखाडा बाळापूर - कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील दोन सख्खे चुलत भाऊ चार ते पाच वयोगटातील शुक्रवार (ता. २०) सकाळपासून खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. दिवसभर गावकऱ्याचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाही. सायंकाळी गावालगत असलेल्या कयाधु नदीच्या पात्रामध्ये दोन्ही चिमकल्यांचे एकमेकांच्या हातात हात धरलेले अवस्थेत मृतदेह सापडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूरपासून जवळ असलेल्या शेवाळ या गावांमध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्वराज दीपक सूर्यवंशी व शिवराज संदीप सूर्यवंशी हे दोन लहान सख्खे चुलत भाऊ वय चार ते पाच वयोगटातील चिमुकले शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून घरासमोर खेळत असताना बेपत्ता झाले होते.

यानंतर घरच्यानी आजूबाजूला खूप शोधण्याचे शोधून पाहिले. परंतु दोन्ही मुले सापडत नसल्याने सदर बातमी गावात पसरून सर्व गावकऱ्यांच्या वतीने गावात सर्वच ठिकाणी दोन मुलांना शोधण्याचे काम सुरू केले होते.

रात्री उशिरा गावाजवळ असलेल्या नदीमध्ये दोन्ही मुलांचे एकमेकांच्या हातात हात घालून सोबत असलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उपस्थित सर्व सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते, शेवाळा गावावर शोककळा पसरुन एकही घरी चुल पेटली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी अलर्ट! आता 'इथून' ट्रेनमध्ये चढलात तर गुन्हा दाखल होणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

Jejuri Wari Accident: 'पंढरीच्या वाटेवर होतो, अन् मागून ट्रक आला अन्..' जखमी वारकरी महिलेने सांगितला थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने अंकित शर्मा यांची हत्या आणि दंगल यांसारख्या गुन्ह्यांसाठी ताहिर हुसेनला दोषी ठरवले

Snake Bite : कोळवण येथे सर्पदंश झालेल्या रुग्णाचा मित्र व घरातील नातेवाईकांच्या तत्परतेने वाचला जीव; कोळवण येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे

SCROLL FOR NEXT