Death of father & son in Latur dist
Death of father & son in Latur dist 
मराठवाडा

लातूर : वाढवण्यात भिंत कोसळून बाप-मुलाचा मृत्यू

युवराज धोतरे

उदगीर (जि. लातूर) - परतीच्या पावसाने कहर केला असून, रविवारी (ता. 20) रात्रीपासून वाढवणा व परिसरात मोठा पाऊस चालू होता. सोमवारी (ता.21) पहाटे पाचच्या सुमारास घरात झोपलेल्या एका कुटुंबावर शेजाऱयाची भिंत पडल्यामुळे त्यात पाच वर्षीय मुलगा व वडिलांचा मृत्यू झाला. 

याबाबत अधिक माहिती अशी की वाढवणा (बु) येथे रविवारपासून पाऊस चालू आहे. या पावसामुळे राम शिवाजी शिंदे हे आपला पाच वर्षांचा मुलगा सचिन व पत्नी असे रविवारी रात्री आपल्या घरात झोपले होते. पाऊस रात्रीपासूनच मुसळधार चालू होता. पहाटेच्या सुमारास शेजारील देविदास चिकले यांच्या घराची भिंत पावसामुळे कोसळून शिंदे कुटुंबीयांच्या पत्रे
असलेल्या घरावर पडली. त्या भिंतीच्या माती आणि मोठ मोठ्या दगडाखाली हे कुटुंबीय अक्षरशः गाडले गेले.

त्यात पत्नी कशीबशी वाचली तेव्हा राम जिवाच्या आकांताने ओरडत होता. तसेच पत्नीही किंचाळत होती. हे रडणे ओरडणे ऐकून बाहेर झोपलेले वडील शिवाजी शिंदे घरात येऊन मातीच्या ढिगाऱ्यखाली गाडलेल्या मुलाला आणि नातवाला काढण्याच प्रयत्न करू लागले. त्याचवेळी शेजारीही धावत आले. प्रत्येकजण मातीचा ढिगारा उपसतच होते. तोवर राम शिंदे यांची जाग्यावरच प्राणज्योत मालवली. 
 
प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्हता वैद्यकीय अधिकारी
मुलगा सचिन यास वाढवणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. पण, येथे वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे त्याला उदगीरला हलविण्यात आले. मात्र, त्याचाही मृत्यू झाला.  या नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळतात उदगीरच्या महसूल विभागाने तत्काळ वाढवणा येथील घटनास्थळास भेट देऊन मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा करून आवश्यक ती मदत देण्यासंदर्भातल्या कारवाईला सुरवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT