सेनगाव तालुक्यात दोन मृत्यूच्या घटना 
मराठवाडा

युवतीचा विहिरीत तर पूरात अडकून वृध्दाचा मृत्यू; सेनगाव तालुक्यातील घटना

विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय युवतीचा पाय घसरुन पडल्याने मृत्यु झाला तर साखरा फाट्याजवळील एका नाल्यात पुराच्या पाण्यात बुडून एका ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू

विठ्ठल देशमुख

सेनगाव ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील साखरा येथे विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय युवतीचा पाय घसरुन पडल्याने मृत्यु झाला तर साखरा फाट्याजवळील एका नाल्यात पुराच्या पाण्यात बुडून एका ८० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. १६) घडली आहे.

सेनगाव तालुक्यातील साखरा येथील माया संदीप वाकळे ( वय २३) ही बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या साखरा परिसरातील शेतात विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. विहिरीतुन पोहऱ्याने पाणी काढत असताना विहिरीच्या काठावरुन तोल जाऊन माया पाण्यात पडल्यामुळे पाण्यात बुड़ुन तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका युवकाने माहिती दिल्यानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

हेही वाचा - 'बायोलॉजिकल ई'ने तयार केलेली मेड इन इंडिया लस कोरोनावर 90 टक्के प्रभावी आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात ही लस महत्त्वाची ठरेल असं सरकारच्या सल्लागार समितीमधील डॉक्टर्सनी म्हटलं आहे.

तर याच गावातील त्याच दिवशी एका ८० वर्षीय वृध्दाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. साखरा येथे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे परिसरातील नद्या- ओढे- नाले भरभरून वाहत आहेत. बुधवारी साडेआठ वाजताच्या दरम्यान साखरा फाट्यावरील एका नाल्यात बुडून नाथराव दुलाजी वाकळे ( वय ८०) या वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सेनगाव पोलिस ठाण्यात या दोन्ही घटनेची आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. घटनास्थळी सेनगाव पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक दिक्षा लोकडे यांनी भेट दिली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election: प्रत्येक कुटुंबात एक सरकारी नोकरी; बिहार निवडणुकीत मोठी घोषणा; RJD च्या जाहीरनाम्यात नेमकं काय?

Election Commission : बिहार निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा, राजकीय पक्षांना दिला इशारा; म्हणाले, 'एआय व्हिडिओंचा गैरवापर...'

INDW vs SAW: भारताच्या मार्गात पावसाचा खोडा! दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना रद्द झाल्यास कुणाचा फायदा?

Crime News : गर्भवती पत्नीने गाढ झोपलेल्या पतीवर टाकले उकळते तेल; वरून फेकली मिरची पावडर, धक्कादायक घटनेमागचं कारण आलं समोर

PM Modi : भारतात गुंतवणुकीसाठी योग्य वेळ, पंतप्रधान नरेंद्र मोदी; ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’चे उद्घाटन

SCROLL FOR NEXT