10-Ways-to-Avoid-a-Drowning-Accident-MainPhoto.jpg
10-Ways-to-Avoid-a-Drowning-Accident-MainPhoto.jpg 
मराठवाडा

शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा


मुखेड, (जि.नांदेड) ः जांब येथुन गेलेल्या नांदेड- बिदर या राज्य महामार्गावर रस्त्याच्या कामाची सुरवात झाली असून सध्या पुल बनविण्याचे काम गुजरात येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने सुरू आहे. या पुलाच्या कामासाठी करण्यात आलेल्या १० फुटाच्या खोल खड्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची शनिवारी (ता.२२) फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी दीड वाजता घडली.


या बाबत सविस्तर वृत्त असे की, जांब येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेला व मूळचा शिरूर अनंतपाळ जि. लातूर येथील माधव अंतेश्वर सगर (वय ११) व इयत्ता ७ वी मध्ये शिकत असलेला मूळचा नायगाव येथील ज्ञानेश्वर अशोक हुरगुलवाड (वय १३) या अल्पवयीन मुलांचा शेताकडे जात असताना पाय घसरुन पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा -  शिक्षकांच्या या अधिवेशनाला येणार इतके मंत्री ​
सदरची घटना कळताच जांब (बु.) येथील जमादार नागोराव पोले, पोलिस कर्मचारी कामजळगे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जांब येथे आणण्यात आले. जांब चौकीच्या पोलिस उपनिरीक्षक अनिता ईटुबोने, मनोज गोंड, अण्णाराव शिंदे, श्रीकांत सूर्यवंशी, दयानंद कानगुले, काळबा बोईनवाड व त्या मयत मुलांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी भेट देऊन मयतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई तत्काळ द्यावी अशी मागणी केली. या बाबत मुखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिता ईटूबोने यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.


कंधारमधील एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू
पोहण्याचा मोह झाल्याने मात्र पोहता येत नसताना सुद्धा मन्याड नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी एकजण बुडाल्याची घटना शनिवारी (ता.२२) सकाळी दहाच्या सुमारास घोडज (ता.कंधार) येथे ऋषी महाराज मंदिराजवळ मन्याड नदीच्यापात्रात घडली. तसेच या वेळी घोडज येथील एका विद्यार्थ्याने जीवाची बाजी लावून दोघा विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले. दरम्यान, या घटनेबाबत कंधार पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.


ओम विजय मठपती (वय १६), गजानन विश्वनाथ श्रीमंगले (वय १४) आणि अजित कोंडीबा डुंडे (वय १४) हे तिघे वर्गमित्र घोडज (ता.कंधार) येथील नदीपात्रातील ऋषी महाराज मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. या तिघांनाही पोहता येत नव्हते. तरी पण त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. नेमक्या त्याचवेळी घोडज येथील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे हा विद्यार्थी दर्शनासाठी मंदिरात आला होता. पाणी घेण्यासाठी तो नदीकडे येत असताना त्याला तीन विद्यार्थी बुडत असलेले दिसले. त्याने मागचा-पुढचा विचार न करता पाण्यात उडी घेतली. त्याने जीवाची बाजी लावून दोघांना वाचवले. पण, त्याला ओम मठपती या विद्यार्थ्याला वाचवता आले नाही. शेवटी ओम मठपती हा दहावीत शिकत असलेला विद्यार्थी बुडून मरण पावला. गावातील संग्राम घुगे व गंगाधर लाडेकर यांनी प्रेताचा शोध घेतला. शनिवारी दुपारी दोन वाजता प्रेत नदीबाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यासाठी छावाचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील लाडेकर, पोलिस पाटील भीमराव लाडेकर यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT