file photo 
मराठवाडा

पाथरीतील साई संस्थांन विश्वस्तांचा  खंडपीठमध्ये जाण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

पाथरी (जि. परभणी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वादावर पडदा टाका’ अशी भूमिका घेतल्यानंतर साई संस्थानच्या विश्वस्तांची गुरुवारी (ता. २३) तातडीने बैठक झाली. यात विश्वस्थ मंडळाने औरंगाबाद खंडपीठात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.
साईबाबा यांच्या पाथरी येथील जन्मभूमीच्या १०० कोटी रुपये विकास आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्यानंतर शिर्डी ग्रामस्थांकडून वाद निर्माण करण्यात आल्यानंतर पाथरी येथील साई भक्त, विश्वस्त आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन पाथरी हीच साई जन्मभूमी असल्याच्या दाव्यावर ठाम राहिले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी (ता. २२) खासदार संजय जाधव व आमदार सुरेश वरपुडकर यांनी मुंबईत भेट घेतली असता, ‘आता पाथरी हीच साई जन्मभूमी’ या वादावर पडदा टाका, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली. पाथरीत त्याचे तीव्र पडसाद उमटले. गुरुवारी (ता. २३) पाथरी येथील साई संस्थान विश्वस्त आणि कृती समितीची बैठक पार पडली. यात साई जन्मभूमी पाथरीच असून या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात जाण्याचा निर्णय या समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.

हेही वाचा - शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रम

पाथरीत भाविकांची संख्या वाढली
 काही दिवसांपासून सुरू असलेल्या साई जन्मभूमीच्या वादाने चर्चेत आलेल्या पाथरीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली. दोन दिवसांत दहा हजार भाविकांनी साईचरणी माथा टेकला. पाथरी येथील साई जन्मभूमीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर शिर्डीकर संतप्त झाले होते. चार दिवसांपासून शिर्डी व पाथरी येथील भक्तांच्या दाव्या-प्रतिदाव्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

महाआरती करण्यात आली

दरम्यान,  पाथरी हेच जन्मभूमी असून त्याचे अस्थित्व कुणी नाकारू नये, यासाठी साई जन्मसंस्थान पाथरी (जि. परभणी) च्या वतीने मंगळवारी (ता. २१) महाआरती करण्यात आली. या महाआरतीच्या माध्यमातून परभणीकरांनी हीच साईबाबांची जन्मभूमी असल्याचे परत एकदा म्हणणे मांडले. या वेळी उपस्थित सर्व नेत्यांनी साईबाबांचे जन्मस्थळ हे पाथरी असून त्याचा हक्क आम्ही सोडणार नाही, असे परत एकदा स्पष्ट केले आहे. साई जन्मभूमीच्या वादाने चर्चेत आलेल्या पाथरीतील साई मंदिरात आज भाविकांची संख्या वधारली होती. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांसह कर्नाटक व आंध्रप्रदेशातून आलेल्या भाविकांनी साई चरणी माथा टेकला.
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

Google Privacy Settings : तुमच्या प्रत्येक हालचालीवर गुगलची नजर? आत्ताच बंद करा 'या' 4 सेटिंग; नाहीतर ट्रॅक होत राहील डेटा

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT