Beed News sakal
मराठवाडा

Beed News: एकएक श्वासासाठी बाळ लढलं, पण नियतीच्या मनात काही वेगळचं होतं...; बीड जिल्ह्यातील घटनेने हळहळ

Ambajogai Case: स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात मृत घोषित केलेल्या नवजात बाळाने घरी नेल्यानंतर हालचाल केल्या. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच अखेरचा श्वास घेतला.

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई : मागील चार दिवसांपासून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ‘त्या’ बाळाने शुक्रवारी (ता.११) रात्री अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, या घटनेचा चौकशी अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात महिला प्रसूत झाली होती. तेव्हा तिचे बाळ मृत घोषित करून नातेवाइकांना सोपवले होते.

मात्र, घरी नेल्यानंतर या बाळाच्या हालचाली सुरू झाल्या. बाळ जिवंत असल्याचे लक्षात येताच नातेवाइकांनी रुग्णालय गाठले होते. त्यानंतर मंगळवारपासून (ता. आठ) अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

शुक्रवारी रात्री या बाळाने अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, प्रभारी अधिष्ठांतांनी यापूर्वीच्या घटनेच्या चौकशीसाठी दोन समित्या नियुक्त केल्या आहेत.

हे बाळ हे फक्त २६ आठवड्यांचे होते, त्याचे वजनही कमी म्हणजेच ९०० ग्रॅम होते. त्यामुळे त्याचे विविध अवयवही विकसित झाले नव्हते, याबाबतची माहिती नातेवाइकांनाही दिली होती. डॉक्टरांनी बाळाला वाचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. मात्र, त्याच्या प्रकृतीने प्रतिसाद दिला नाही.

- डॉ. गणेश तोंडगे,

स्त्रीरोग विभागप्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani : पुण्याहून परभणीला निघालेल्या बसमध्ये प्रसूती, बाळाला खिडकीतून फेकलं; १९ वर्षीय तरुणीसह तरुणाला अटक, काय घडलं?

ENG vs IND: इंग्लंडचे पहिले पाढे पच्चावन्न! लॉर्ड्स कसोटी जिंकली, पण केली मोठी चूक; आयसीसीने WTC मधील पाँइंट्सच कापलं

Poshamma Talli Puja: आषाढात का केली जाते पोशम्मा तल्लीची पूजा? जाणून घ्या पौराणिक कथा

सलमान-रणबीरला सोडून कतरिनाने विकीसोबत लग्न का केलं? अभिनेत्रीनेच सांगितलं गुपित!

Non Veg Milk: काय आहे 'नॉन-व्हेज दूध'? अमेरिका आणि भारताची चर्चा यावरच अडकली; शेतकरी मात्र चिंतेत

SCROLL FOR NEXT