अधिकारी - कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिक 
मराठवाडा

Video : दंगलसदृश्य परिस्थितीच्या नियंत्रणासाठी ‘मॉकड्रील’

सकाळ वृत्तसेवा

परभणी : मोर्चा दरम्यान, उदभवलेल्या कठिण प्रसंगी निर्माण होत असलेली दंगल सदृश्य परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिक (मॉकड्रील) शनिवारी (ता.२८) येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर तिन्ही पोलिस ठाण्यांच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी करून दाखविले.प्रात्यक्षिका दरम्यान, गैस सेलमधुन हवेत फायरिंग करण्यात आली. या वेळी मोठ्ठा आवाज झाला.

पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शनिवारी सकाळी सहाय्यक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मॉकड्रील’ घेण्यात आले. या वेळी नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल बहात्तरे, नवामोंढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, फौजदार सुनील पल्लेवाड, महिला फौजदार श्रीमती भावसार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यालयातील राखीव फौजदार शामराव राठोड, अण्णा बोईनवाड यांनी कर्मचाऱ्यांकडून कवायतीसह प्रात्यक्षिक करून घेतले.

 फायरिंगबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक 
मोर्चा दरम्यान, निर्माण झालेली दंगलसदृश्य परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना करण्याबाबत यावेळी फौजदार शामराव राठोड यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. लाठीचार्ज करूनही जमाव नियंत्रणात येत नसेल तर त्यानंतर बंदुकीतून फायरिंगबाबत घ्यावयाच्या पोझिशन व करावयाची फायरिंगबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वेळी उपस्थित सर्वच कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना करून दाखविल्या.


जखमींना उपचारासाठी नेणे

जसे, की एखादा सहकारी जखमी झाला तर त्याला तातडीने घटनास्थळावहून उचलून उपचारासाठी नेणे, घटनेची माहिती वरिष्ठांना देत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत परिस्थिती अवाक्याबाहेर जाणार नाही, याचे भान राखत तातडीने पावले उचलत दंगलखोरांना पांगवण्याबाबतही या वेळी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या वेळी दंगा नियंत्रण पथकासह तिन्ही पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या टुकड्या करण्यात आल्या. सर्वात पुढे लाठी घेतलेले कर्मचारी उभे करण्यात आले. त्यामागे रायफल घेतलेले कर्मचारी, सोबतच गैस सेल असलेले काही कर्मचारी होते. 


उपाययोजनांचे मार्गदर्शन
शहरातील तिन्ही पोलिस ठाण्यांच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर ती कश्याप्रकारे हाताळावी, याबाबत प्रात्यक्षिक घेण्यात आले. अप्रिय घटना घडू नयेत. घडल्याच पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. 


- नितीन बगाटे, सहाय्यक पोलिस अधीक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : सावधान ! नवी मुंबईत भीक मागणाऱ्या टोळीचा हनी ट्रॅप, भर रस्त्यात 'असं' शोधल जातं सावज, आतापर्यंत अनेकांना लुटले

Ajit Pawar work documentation : अजित पवार यांच्या कार्याचा समृध्द दस्तऐवज तयार होणार, ३५ वर्षातील कार्याला उलगडा होणार

Latest Marathi News Live Update : वर्धा-तुळजापूर दरम्यान जीटी एक्सप्रेसला भीषण आग

Exam Paper Burning: बीडमध्ये कॉपीचे गठ्ठे जाळतानाचे व्हिडिओ समोर; सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई होणार, शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ!

Justice for Sahil: "मी त्याला २३ वर्षे एकटीने वाढवलं, जपलं..."; स्टंट करताना स्कॉर्पिओने मुलाला चिरडले, एकट्या आईची न्यायासाठी धडपड

SCROLL FOR NEXT