Dengue
Dengue 
मराठवाडा

लातूरमध्ये डेंगीचे नऊ रुग्ण

सकाळवृत्तसेवा

लातूर - गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या कारणांमुळे शहरातील डेंगीचे संशयित रुग्ण वाढत आहेत. मागील दोन आठवड्यांत केवळ शासकीय वैद्यकीय सर्वोपचार रुग्णालयात डेंगीची लागण झालेले ९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे डेंगी शहरात पसरतोय, हे स्पष्ट होत आहे; पण त्या तुलनेने महापालिका किंवा जिल्हा प्रशासन कुठलीही व्यापक मोहीम राबविताना दिसत नाही. त्यामुळे लातूरकरांचे आरोग्य धोक्‍यात सापडले आहे. 

मागील महिन्यात पावसाळी वातावरणामुळे डेंगीच्या डासांनी डोके वर काढायला सुरवात केली होती. त्यामुळे पालिकेने काही भागांत तात्पुरती जनजागृती मोहीम राबविली; पण गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून पाऊस नसला तरी डेंगीचे संशयित रुग्ण आणि लागण झालेल्या रुग्णांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. त्यामुळे शहरात व्यापक जनजागृती आणि स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्‍यकता आहे.  टायर, माठ, जुने बूट, बाटल्या अशा वस्तूंची विल्हेवाट लावायला हवी. अशा वस्तूंत पाणी साचून डेंगीच्या अळ्या तयार होतात. याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे, अशी अपेक्षा वैद्यकीय तज्ज्ञ आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

याकडे लक्ष द्या
 घरातील सर्व पाणीसाठे घट्ट झाकून ठेवा. 
 आठवड्यातून एकदा हौद, टाक्‍या धुवून घ्या. काहीवेळ कोरडे ठेवून त्यानंतर पाणी भरा.
 घरातील फ्लॉवर पॉट, कुलरमधील पाणी नियमितपणे बदला.
 लहान मुलांनी, वयोवृद्ध नागरिकांनी पूर्ण अंग झाकले जाईल, असे कपडे वापरावेत. 
 निरुपयोगी साहित्यामध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डासांच्या अळ्या तयार होणार नाहीत हे पाहा.
 बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी डास आळींची पैदास होणार नाही याची काळजी घ्या.

हे खरे आहे की शहरात डेंगीची लागण वाढत आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने घरात आणि सार्वजनिक ठिकाणी योग्य ती काळजी घ्यायला हवी. आठवड्यातून एक दिवस घरात कोरडा दिवस म्हणूनही पाळावा.
- डॉ. राजाराम पोवार, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT