Devendra Fadnavis sakal
मराठवाडा

Devendra Fadnavis : व्यापाऱ्यांसह उद्योजकांनी बळ द्यावे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जालन्यात आवाहन

जालन्याचे उद्योजक, व्यापारी हे कायमच प्रागतिक राहिले असून, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे व्यापाऱ्यांच्या खांद्याला-खांदा लावून उभे राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांत भारत हा ‘फॅक्टरी ऑफ वर्ल्ड’ म्हणून उदयास येणार असून, याकरिता योजना तयार झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जालना : जालन्याचे उद्योजक, व्यापारी हे कायमच प्रागतिक राहिले असून, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे व्यापाऱ्यांच्या खांद्याला-खांदा लावून उभे राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांत भारत हा ‘फॅक्टरी ऑफ वर्ल्ड’ म्हणून उदयास येणार असून, याकरिता योजना तयार झाली आहे. देशाचे भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणुकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी उद्योजक, व्यापाऱ्यांनी रावसाहेब दानवे यांना बळ द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ बुधवारी शहरात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रूपम हॉल येथे उद्योजक, व्यापाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी पालकमंत्री अतुल सावे, खासदार डॉ. अजित गोपछडे, शिवसेना उपनेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार विलास खरात, भास्कर दानवे, उद्योजक घनश्यामदास गोयल, सुनील रायठ्ठा, राहुल अग्रवाल, राजेश राऊत, राजेश सोनी, संजय अग्रवाल, भावेश पाटील, अर्जुन गेही, वीरेंद्र धोका, विजय कामड, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत साहनी, प्रदीप मुथा, विनोद पाटणी, पंकज पाटणी, सत्यनारायण दायमा, आदींची उपस्थिती होती.

यावेळी फडणवीस म्हणाले, ही निवडणूक सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षापूर्तीसाठी असून, देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो? देशाचा विकास कोण करू शकतो? हे जनतेने अनुभवले आहे. संपूर्ण विश्वात सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांनी ख्याती प्राप्त केली आहे. दहा वर्षांत २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेखालून वर आले. सर्वत्र डिजिटल आर्थिक व्यवहार वाढले आहेत. समृद्धी महामार्गामुळे जालन्यातील स्टील उद्योगांना लागणारा कोळशासह कच्चा माल; तसेच पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना विचाराधीन असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी अर्जुन गेही, वीरेंद्र धोका यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस उद्योजक व व्यापारीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगीत खुर्चीचा खेळ

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नेतृत्व नसलेल्या काँग्रेस आघाडीचा समाचार घेतला. विरोधकांकडे अनेक पक्ष आहेत. मात्र, नेता मानायला कोणी तयार नाही. पंतप्रधानपद हे काँग्रेस आघाडीसाठी संगीत खुर्चीचा खेळ असेल. दरवर्षी एका पक्षाचा ज्याला जशी खुर्ची मिळेल तसा पंतप्रधान होईल, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आघाडीवर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs England ODI : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, कारण काय?

Pune Heavy Rain: अतिवृष्टीचा फटका! शिनोली-भोजनेवाडी मार्गावर दरड कोसळली; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर चार मिनिटं हवेतच, एकाच ठिकाणी घिरट्या, नेमंक काय घडलं?

Sangola FDA Raid: सांगोल्यात एफडीएची मोठी कारवाई! ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त; १५ लाखांचा साठा जागेवरच नष्ट

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

SCROLL FOR NEXT