Indian 20-rupee Coin sakal
मराठवाडा

Indian 20-rupee Coin : वीस रुपयांचे नाणे गेले कुठे? ; २०२० मध्ये तयार होऊनही व्यवहारातून गायबच

२०२० मध्ये तयार झालेले वीस रुपयांचे नाणे चार वर्षे उलटले, तरी दुर्मिळ झालेले दिसत आहे. या नाण्याविषयी ग्रामीण भागात उत्सुकता, कुतूहल आहे.

सकाळ वृत्तसेवा

माजलगाव : २०२० मध्ये तयार झालेले वीस रुपयांचे नाणे चार वर्षे उलटले, तरी दुर्मिळ झालेले दिसत आहे. या नाण्याविषयी ग्रामीण भागात उत्सुकता, कुतूहल आहे. परंतु, ते कुठे दिसेनासे झाले आहे. मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा येथील टाकसाळींमध्ये वीस रुपयांचे नाणे तयार झाले. ८ मार्च २०१९ मध्ये नाण्यांची सिरीज जारी करण्यात आली होती. बेलापूर (मुंबई) येथील बॅंकेतून देशभरात ती वितरित केली जातात.

तयार झाल्यापासून एक ते दोनवेळाच वीस रुपयांचे नाणे आमच्याकडे आले. अनेकजण ते पाहण्यासाठी येतात, कुतूहलाने पाहतात. इतर नोटा किंवा दहा रुपयांच्या नाण्यांसारखे या नाण्याचा वापर होताना दिसत नाही.

— अर्जुन शिंदे,

हॉटेल व्यावसायिक, माजलगाव

नाण्याची वैशिष्ट्ये

  • नाण्याला बारा कोन

  • ८.५४ ग्रॅम वजन

  • हलके व टिकाऊ

  • २७ एमएम व्यास, त्यात दोन रिंग

  • वरच्या रिंगमध्ये ६५ टक्के तांबे, १५ टक्के झिंक व २० टक्के निकेल

  • दुसऱ्या रिंगमध्ये ७५ टक्के कॉपर, २० टक्के झिंक व ५ टक्के निकेल

  • स्पर्शाने सहज ओळखता येते, दृष्टिहीनांसाठी उपयुक्त

  • नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभावरील सिंहाची मुद्रा

  • दोन्ही बाजूला हिंदीतून भारत व इंग्रजीतून इंडिया, त्याखाली सत्यमेव जयते

  • दुसऱ्या बाजूस पाने किंवा पाण्याचे थेंब हे हिरव्या शेतीविषयक प्रतीक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT