file photo 
मराठवाडा

दलितवस्ती भ्रष्टाचार प्रकरणातील कंत्राटरास कोठडी

सकाळवृत्तसेवा

 नांदेड : दलितवस्ती सुधार योजनेच्या कामात गैरव्यवहार प्रकरणी फरार आरोपी अखेर सोमवारी (ता.२७) सिंदखेड (ता. माहूर) पोलिसांच्या जाळ्यात अडकला. वाई बाजार (ता.माहूर) ग्रामपंचायतीच्या दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत विकास कामात गैरव्यवरहार प्रकरणी तीन वर्षापूर्वी अपहारातील दोषींवर सिंदखेड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्ह्या दाखल झाला होता. त्या गुन्ह्यातील आरोपींपैकी कंत्राटदार पोलिसांना गुंगार देवून तीन वर्षापासून फरार होता. अखेर सोमवारी (ता.२७) सिंदखेड पोलिसांनी आरोपी विजय घोगरे पाटील यास अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.  

वाई बाजार ग्रामपंचायतीत दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत विकास कामांची कागदोपत्री नोंद करुन पाच लाख रुपये निधी हडप केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. योजनेअंतर्गत गावातील सिमेंट काँक्रेट रस्ता व नाली बांधकामाचा निधी काम न करताच उचलण्यात आल्याने अपहार प्रकरणी दोषींवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. यासाठी वाई येथील बाबाराव कंधारे यांच्यासह महीला- पुरूष मंडळींनी तीन वर्षापूर्वी माहूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. 

आरोपींच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा 
दलितवस्ती सुधार योजनेतील अपहारप्रकरणी आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार वाई बाजार ग्रामपंचायतीमध्ये इनकँमेरा चौकशी करण्यात आली. इनकॅमेरा जबाबानुसार योजनेच्या कामात अपहार सिद्ध झाल्याने माहूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी यु. बी. मांदाडे यांनी सिंदखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वाई बाजारचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी बाबूलाल कासदेकर याच्यासह तत्कालीन उपअभियंता खान व श्री.साईकृपा कन्सट्रक्शन कंपनी नांदेडचे विजय घोगरे पाटील यांंच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

कंत्राटदार आरोपीचा पोलिसांना गुंगारा 
दलितवस्ती सुधार योजनेत अपहार प्रकरणातील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी बाबूलाल कासदेकर, उपअभियंता खान यांना यापुर्वीच अटक होवून त्यांना जामीन मिळाला होता. परंतू संबंधित कंत्राटदार एजन्सी चालक विजय घोगरे पाटील हा मागील तीन वर्षांपासून पोलीसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता.

अटक आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी 
दलितवस्ती सुधार योजनेच्या कामात अपहार प्रकरणी तीन वर्षापासून फरार आरोपी कंत्राटदार विजय घोगरे पाटील यास सोमवारी (ता.२७) सिंदखेड पोलिसांनी अटक करुन माहूरच्या प्रथमसत्र न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने त्यास तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मल्हार शिवरकर करत आहेत. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर, कोळी बांधवांचा गंभीर आरोप, अखेर मूर्ती तराफ्यावर!

DMart Offers : डीमार्टचा मोठा स्कॅम? गिफ्ट व्हाऊचर देणार अन् मिनिटांत मोबाईल हॅक; खरेदी करण्याआधी 'हे' एकदा बघाच

PM Modi Manipur Visit : पंतप्रधान मोदी तीन तासांसाठी मणिपूरला जाणार; हिंसाचारानंतरचा पहिलाच दौरा; काँग्रेसची टीका

Latest Maharashtra News Live Updates: लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं ! साडेदहा-अकरा वाजेपर्यंत लांबण्याची शक्यता

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानांच्या गणपतीची मिरवणूक वेळेत संपली; इतर मंडळांच्या मिरवणुकीला लागतोय वेळ

SCROLL FOR NEXT