beed sakal
मराठवाडा

Beed News : तालुक्यात विकास गंगा घेऊन येणार ; धनंजय मुंडे : पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण

शिरूर कासार येथील पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण मंगळवारी (ता.२३) झाले. यावेळी ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

शिरूर कासार : गोपीनाथ मुंडे यांचे सर्वांगीण विकासात्मक स्वप्न पूर्ण करण्याचे पालकत्व मी घेतले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

शिरूर कासार येथील पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण मंगळवारी (ता.२३) झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब आजबे, अविनाश पाठक, रामकृष्ण बांगर, शिवाजी राऊत, दशरथ वनवे, गहिनीनाथ सिरसाट, विश्वास नागरगोजे, दिलीप घुंबरे, नवनाथ ढाकणे, बाळासाहेब केदार, बाबूराव केदार, सतीश शिंदे, महेश ढाकणे, प्रियंका केदार, डॉ. आर. एस. बडजाते, आक्षय जाधव, मदन मस्के, यसिन शेख, तहसीलदार बिपिन पाटील, गटविकास अधिकारी संजय केंद्रे उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी केले.

पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण झाल्यानंतर तालुक्यातील विविध विभागांच्या कार्यालयाचे ५६ कोटी ६६ लाख व तालुक्यातील काही रस्त्यांचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्याचे आणि मुंडे कुटुंबाचे नाते जिव्हाळ्याचे आहे. तालुक्यात विकास गंगा घेऊन येणार असून, ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र ऊस तोडणीसाठी जात आहेत.

येत्या सहा वर्षांत ऊसतोड मजुरांना ऊस उत्पादन करण्यासाठी सिंचनाचे साधने निर्माण करणार असून, तालुक्याचा मागासलेला डाग काढून तालुका सुजलाम् सुजलाम् होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी धनंजय मुंडे यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी जेसीबींमधून त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. हिवरसिंग, खोकरमोह, रायमोह, पाडळी, आनंद गाव येथेही जंगी स्वागत करण्यात आले.

दरम्यान, महसुल प्रशासन अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, दुय्यम निबंधक कार्यालयात इमारत, तालुका कृषी कार्यालय इमारत, ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी भगवान बाबा शासकीय वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कार्यालय व वसतिगृह, ग्रामीण रूग्णालय इमारत कामाचे भूमिपूजनही झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : उदय सामंतांनी घेतली शरद पवार यांची भेट...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

अरे हा काय टाइमपास लावलाय... तेजश्री- सुबोधच्या नव्या मालिकेवर प्रेक्षक नाराज; म्हणतात- एकही भाग पॉझिटिव्ह...

Kolhapur Flyover Project : कोल्हापुरात दोन उड्डाणपूल होणार, सायबर चौक, संभाजीनगर चौकात उभारणी शक्य, अमल महाडिक यांची माहिती

SCROLL FOR NEXT