Navratri 2024,Tuljapur temple  sakal
मराठवाडा

Navratri 2024 : तुळजापूर, माहूरमध्ये गर्दीचा ओघ सुरूच...तुळजाभवानीमातेची मुरलीअलंकार महापूजा

Tuljapur temple : नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी तुळजापूर आणि माहूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली.

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला, मंगळवारी (ता. ८) तुळजाभवानीमातेची मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी आजही भाविकांची मोठी गर्दी होती.

नवरात्रोत्सवात देवीची वेगवेगळ्या स्वरूपात पूजा बांधल्या जातात. काल रथालंकार महापूजा बांधण्यात आली होती. आज सकाळी अकराच्या सुमारास मुरलीअलंकार महापूजा बांधण्यात आली. हाती मुरली (बासरी) घेतलेली देवी, असा या महापूजेचा आशय. सकाळी नित्य अभिषेक पूजा झाल्यानंतर देवीच्या मस्तकी गंधलेपन करण्यात आले. महावस्त्राचा पेहराव करण्यात आला. मूर्तीला दागिने घालण्यात आले.

दिवसभर मोठी गर्दी

तुळजाभवानीमातेच्या दर्शनासाठी आजही महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील भाविकांची मोठी वर्दळ होती. सुमारे दीड लाख भाविकांनी दिवसभर दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

भाविक रमले आरतीमध्ये

तुळजाभवानीमातेच्या दर्शनासाठी आलेले अनेक भाविक कुटुंबातर्फे पुजाऱ्यांकरवी देवीची आरती करतात. गोंधळ कट्ट्याच्या पाठीमागील परिसरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हातामध्ये तबक घेऊन भाविकांकडून आरती सुरू असते. यावेळी देवीचे पाळीकर पुजारी, भोपे पुजारी, उपाध्ये पुजारी भाविकांच्या कुटुंबीयांना सर्वांच्या कल्याणाचा आशीर्वाद देतात.

माहूरच्या रेणुका देवी मंिदरात कुमारिका पूजन

नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला रेणुकादेवीच्या मंदिरात विविध कार्यक्रम झाले. सकाळी सातला वैदिक महापूजेला सुरवात झाली. देवीला अलंकारांसह लाल महावस्त्र (पैठणी) अर्पण करण्यात आले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुर्गा सप्तशती पाठ झाला.

दुपारी पायसचा नैवेद्य दाखविल्यावर आरती झाली. छबिना मिरवणूक काढण्यात आली. परिवार देवतांचे पूजन झाल्यानंतर भगवान परशुराम मंदिर परिसरात महाप्रसाद वाटप सुरू झाले. त्यानतर महाआरतीद्वारे दुपारचे धार्मिक कार्यक्रम सुरू झाले.

मंदिर संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर, सचिव तथा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारीका पूजन उत्साहात झाले.

तुळजाभवानीमातेस नवरात्राच्या सहाव्या माळेस मुरलीअलंकार महापूजा बांधली जाते. असुरांपासून भवानीमातेने देवी-देवतांना वाचवून आनंदी केले. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने त्याची प्राणप्रिय मुरली देवीस भेट दिली, अशी त्यामागची आख्यायिका आहे. त्यामुळे हे पूजा होते.

- नागनाथ ऊर्फ भाऊ भांजी, पुजारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT