Dhananjay Munde esakal
मराठवाडा

गायब विरोधक दसरा-दिवाळी बघून येतात, धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

एक दिवस लोकांमध्ये गेले की दुसऱ्या दिवशी सर्दी खोकला येतो. आणि परत निघून जातात, असा टोला सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना नाव न घेता लगावला.

दत्ता देशमुख

बीड : मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागले तेव्हापासून जनतेतून गायब असलेले विरोधक दसरा-दिवाळी बघून येतात. एक दिवस लोकांमध्ये गेले की दुसऱ्या दिवशी सर्दी खोकला येतो. आणि परत निघून जातात, असा टोला सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना नाव न घेता लगावला. सिरसाळा (ता. परळी) येथे उपबाजारपेठ अंतर्गत गाळे बांधकाम प्रसंगी श्री. मुंडे बोलत हेाते. बीडमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजपने केलेल्या धरणे आंदोलनात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अकल्याणकारी नेते अशी टीका करुन जिल्ह्यात (Beed) माफियाराजला सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असल्याची टीका केली होती. त्याला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्र दिले.

श्री.मुंडे म्हणाले, आम्ही पहिल्या दिवसापासून मदत करण्याच्या भूमिकेत आहोत. शेकडो रुग्णांना कोविड काळात मदत केली. हजारो कुटुंबांना अन्न धान्य पुरवले, हजारोंना मोफत रेमडीसीवीर उपलब्ध करून दिले. त्यात काही भाजपचे कार्यकर्तेपण होते. पण आम्ही केलेली मदत या हाताची त्या हाताला कळू देत नाही, असा आमचा स्वभाव आहे. आणखी बोलणार आहे, सगळं आजच संपवत नाही, असा इशारा देत वैद्यनाथ सुरू होणार का शेतकऱ्यांना सांगा, असा सवालही त्यांनी केला. एकीकडे मतदारसंघातल्या संस्था समृद्ध होत आहेत तर दुसरीकडे हजारो शेतकऱ्यांची आशास्थान असलेला वैद्यनाथ साखर कारखाना वाईट अवस्थेत आहे. तो यावर्षी सुरू होणार आहे का असे किमान एखादे ट्विट करून तरी सांगावे, असे म्हणतच या भागातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेऊ, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee Setback : उद्धव ठाकरेंपेक्षाही ममता बॅनर्जींना धक्का!, ८० पैकी ५९ आमदार साथ सोडणार; बंगालचे एकनाथ शिंदे कोण?

Mumbai News: पूरमुक्त मुंबईसाठी महापालिका सज्ज! पंपिंग स्टेशन, पर्जन्यवाहिन्यांवर लक्ष

Team India Coach: भारतीय संघात नव्या कोचची एन्ट्री! कोण आहेत गौतम गंभीरच्या टीममध्ये सामील झालेले नवीन सदस्य?

व्वा, काय व्यवस्था आहे! तरुणपणी परीक्षा दिली, पण सेवानिवृत्तीचे वय ओलांडल्यानंतर आलं नियुक्तीपत्र, लोकसेवा आयोगाचा गोंधळ

हायव्होलटेज ड्रामा! आधी उमेदवारी अर्ज बाद झाला, आता पित्रा-पुत्रावर गुन्हा दाखल; अमरावतीत शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर कारवाई

SCROLL FOR NEXT