Dhanjay Munde sakal
मराठवाडा

Dhanjay Munde : मोठा भाऊ म्हणून पंकजांचे स्वागत करतो ; गोपीनाथगडावर ‘हा’ माझ्यासाठी भावनिक दिवस

कुटुंबातील मोठा भाऊ म्हणून पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यासाठी इथे आलो असून, हा माझ्यासाठी भावनिक दिवस आहे. लोकसभेची निवडणूक एकतर्फी होऊन पंकजा मुंडे यांचा मोठा विजय होईल, असे मत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ : कुटुंबातील मोठा भाऊ म्हणून पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यासाठी इथे आलो असून, हा माझ्यासाठी भावनिक दिवस आहे. लोकसभेची निवडणूक एकतर्फी होऊन पंकजा मुंडे यांचा मोठा विजय होईल, असे मत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

लोकसभेच्या बीड मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यावर पंकजा मुंडे पहिल्यांदाच येथे आल्या. गोपीनाथगडावर त्यांचे आगमन होताच धनंजय मुंडे यांच्यातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. अकरा क्विंटल फुलांचा हार, ५२ जेसीबींतून फुलांची उधळण व नाशिक येथील ढोलपथकाच्या गजरात पंकजा मुंडे यांचे स्वागत झाले. खासदार डॉ. प्रीतम मुंडे, भाजपचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे व प्रीतम मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, की खऱ्या अर्थाने पालकमंत्री म्हणून मी पंकजा यांचे जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करायला हवे होते; पण पंकजा यांनी सांगितले, की मी घरी येणार आहे. तिथे स्वागत स्वीकारू. त्यानुसार गोपीनाथगडावर स्वागत केले. ‘मी सर्व गडांवर जाऊन आशीर्वाद घेत आहे. माझ्या वडिलांच्या नावाने तयार केलेल्या गडावर आज आशीर्वाद घेण्यासाठी आले आहे. निवडणुकीत विजयी होण्याचे आशीर्वाद गोपीनाथराव मुंडे यांनी मला दिले’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान, शहरातील विविध चौकांमध्ये पंकजा मुंडे यांचे ढोल-ताशांच्या गजरात व जेसीबींच्या सहाय्याने फुलांची उधळण करीत स्वागत झाले.

तडोळी तांड्यावर होळी साजरी

तडोळी तांडा इथे गौरबंजारा महिलांचा पारंपरिक ड्रेस परिधान करून पंकजा व डॉ. प्रीतम मुंडे यांनी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली. या वेळी पंकजा व प्रीतम मुंडे यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

रस्त्यावर झोपून काढले दिवस, आज दीड एकरमध्ये उभा आहे आलिशान बंगला; पाहा मिथुन चक्रवर्तींच्या घराची झलक

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

SCROLL FOR NEXT