COllector Office Jalna Vehicle Damages sakal
मराठवाडा

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड; जिल्हाधिकारी यांचे खासगी वाहन फोडले

धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करून आरक्षण जाहीर करावा या मागणीसाठी मंगळवारी (ता. 21) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

उमेश वाघमारे

जालना - धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करून आरक्षण जाहीर करावा या मागणीसाठी मंगळवारी (ता. 21) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर मागणीचे निवेदन देण्यासाठी निघालेल्या शिष्टमंडळासोबत आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले.

यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या खाजगी वाहनासह इतर वाहनांची तोडफोड केली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्याचा ही प्रयत्न झाला.

धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे, ही अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र, याची अंमलबजावणी न झाल्याने धनगर समाज आक्रमक झाला असून मंगळवारी (ता. 21) जालना शहरातील गांधीचे चमन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आंदोलन शेवटच्या टप्प्यापर्यंत शांततेत सुरू होते.

मात्र, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत आंदोलनात सहभागी झालेले इतर आंदोलक ही जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घुसले. या जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयात पार्क केलेल्या दुचाक्या, फुलांचे झाड आणि जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या खाजगी वाणासह अन्य एका चार चाकी वाहनाची तोडफोड केली.

शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी मध्यस्ती करून जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसलेला सर्व जमाव बाहेर काढला. मात्र, या घटनेमुळे या आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT