water ssupply esakal
मराठवाडा

Water Supply : धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये आठ दिवसातून एकदा पाणी

धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये एक ते नऊ दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

धाराशिव - जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये एक ते नऊ दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जात आहे. गेली अनेक वर्षे आमदार म्हणून असलेल्या नेत्यांनी मोठ्या शहरांची तहान भागविलेली नसल्याचे यावरून दिसत आहे. आमदार म्हणून घेणाऱ्या नेत्यांची ही राजकीय अनास्था असून, एकप्रकारे टोलवाटोलवी करीत असल्याचे चित्र आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

जिल्ह्यातील नागरिकांना दररोज किमान ४० लिटर पाणी मिळावे, हा त्यांचा अधिकार आहे. मात्र जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये एक ते आठ दिवसाआड पाण्याचा पुरवठा होत आहे. धाराशिव शहराला उजनी (जि. सोलापूर) येथून सुमारे १८६ किलोमीटर अंतरावरून पाण्याचा पुरवठा होतो. एक ते दोन दिवसाआड पाणी मिळणे अपेक्षित असताना पाच दिवसातून तर कधी आठ दिवसातून पाणी मिळत आहे. कळंब शहराचीही अशीच स्थिती आहे.

मांजरा प्रकल्पातून शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या चार दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. भूम, परंडा तसेच वाशी शहराला तीन दिवसातून एकदा पाणी मिळते. तर तुळजापूर शहराला मात्र एका दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे राज्यातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होते.

राजकीय अनास्था की पाण्याचा स्त्रोत नाही

धाराशिव शहर सोडून इतर अन्य मोठ्या शहराच्या जवळच पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहेत. तरीही तेथे तीन ते आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो. अशा शहरात पाणीपुरवठा योजना योग्य पद्धतीने राबविलेली नाही. ठेकेदाराला पाठीशी घालून योजनांचा बट्याबोळ करण्याचे धोरण राज्यकर्ते राबवित असल्याची टीका सामान्य वर्गातून होत आहे.

पाणीपुरवठ्यात आमदार चौगुले नापास

उमरगा, लोहारा दोन्ही तालुक्याच्या ठिकाणी तब्बल आठ दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. गेली १४ वर्षे येथे शिवसेनेचे आमदार आहेत. ज्ञानराज चौगुले तिसऱ्यांदा विधानसभेत गेले आहेत. मात्र त्यांना दोन्ही शहरांना पाणी देण्यात त्यांना अपयश आल्याचे चित्र दिसत आहे. नळदूर्ग शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बोरी धरण आहे. येथून तुळजापूरला एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. मात्र नळदूर्ग शहरात तब्बल नऊ दिवसातून एकदा पाण्याचा पुरवठा होत आहे.

असे मिळते पाणी

धाराशिव शहराला पाच दिवसाआड, नळदूर्ग नऊ, उमरगा आठ, लोहारा आठ, मुरुम चार, कळंब चार, परंडा तीन, वाशी तीन तर भूम शहरालाही तीन दिवसाआड पाणीपुरठा होतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 50,000 चे झाले तब्बल 7 लाख! 1320% रिटर्न देणाऱ्या शेअरची जोरदार चर्चा; 3 आठवड्यांत पैसा डबल

Vaibhav Sooryavanshi चा खेळ पाहण्यासाठी अजित आगरकर चेन्नईत पोहोचणार! KL Rahul ची माघार, हा सामना कुठे रंगणार, Live कुठे?

हिमालाय वितळण्याचं कारण मानवी मूत्र, दरवर्षी २५०० टन बर्फाचं होतंय पाणी; धक्कादायक माहिती समोर

Marathi News Live Updates: जेडब्ल्यू मॅरियट आणि शेराटन हॉटेलविरुद्ध पुणे पोलिसांची कारवाई

Teachers Day 2026: आयुष्यभराची २५ लाखांची कमाई मुलांच्या शिक्षणासाठी खर्चली; शिक्षकाने उभारली वंचितांसाठी शाळा!

SCROLL FOR NEXT